corona update : कोरोना रुग्णांची टक्केवारी घसरली; २४ तासांत आढळले १०,२७३ रुग्ण  | पुढारी

corona update : कोरोना रुग्णांची टक्केवारी घसरली; २४ तासांत आढळले १०,२७३ रुग्ण 

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : देशात मागील काही दिवसांपासून कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. आजदेखील कोरोना रुग्णांची सर्वांत कमी नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार देशात मागील २४ तासांमध्ये १० हजार २७३ रुग्ण आढळून आलेले आहेत. पाॅझिटिव्हीचा दरदेखील केवळ टक्क्यांवर आला आहे. आज मागील २४ तासांच्या आकडेवारीच्या तुलनेत १२२६ कमी रुग्ण आढळले आहेत.

कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची आकडेवारीदेखील सलगपणे कमी होताना दिसत आहे. मागील २४ तासांत २० हजार ४३९ रुग्ण कोरोनातून बरे झालेले आहेत. कालच्या तुलनेत मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्याही नकळत कमी झालेली आहे. आज कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ही २४३ इतकी आहे. तर दुसरीकडे कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण आकडेवारी  १ लाख ११ हजार ४७२ आढळून आलेले आहेत.

आतापर्यंत कोरोना महामारीत मृत्यू झालेल्यांची संख्या ५ लाख १३ हजार ७२४ झालेली आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ४ करोड २२ लाख ९० हजार ९२१ नागरिक कोरोनातून बरे झालेले आहेत. राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमनुसार कोरोना लसीकरण अभियानामध्ये सुमारे १७७ करोड लसी देण्यात आलेल्या आहेत. काल २४ लाख ५ हजार ४९ लसी देण्यात आल्या आहेत. त्यानंतर कोरोना लसींची आकडेवारी ही १७७ करोड ४४ लाख ८ हजार १२९ लसी देण्यात आल्या आहेत.

व्हिडिओ पहा : कसा भरायचा ठाण्यात आनंद दिघेंचा दरबार? 

Back to top button