सीएम योगी आदित्यनाथ यांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंची तोफ धडाडली ! | पुढारी

सीएम योगी आदित्यनाथ यांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंची तोफ धडाडली !

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्‍तर प्रदेशमधील शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी मंत्री आदित्‍य ठाकरे यांची आज गोरखपूर येथे प्रचार सभा पार पडली. यावेळी येथील भाजप सरकारवर त्‍यांनी निशाणा साधला. महाराष्ट्रात मागील सरकारने चूकीच्या गोष्‍टी केल्‍या आहेत असे आदित्‍य ठाकरे म्‍हणाले. उत्‍तर प्रदेशात रोजगार, महिलांला सुरक्षितता मिळायला हवी असे म्‍हणत सध्याचे आजी मुख्यमंत्री हे माजी होतील असे आदित्‍य ठाकरे म्‍हणाले.

उत्‍तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये आता शिवसेनेचे उमेदवार उतरले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी आदित्‍य ठाकरे यांनी गोरखपूर येथे प्रचारसभा घेतली. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत उपस्‍थित होते. यावेळी भाषणात आदित्‍य ठाकरे म्‍हणाले, येथे द्वेषाचे राजकारण नको, तसेच लोकांना भीती दाखवली जाते, परंतु याला कोणीही घाबरू नये. तसेच आंदोलनातून शेतक-यांना बदनाम करण्यात आले होते. कारण त्‍यांच्या हाती लाल झेंडे होते. तसेच त्‍यांना नक्षलवादी संबोधले होते. याचे मला दुःख आहे कारण आम्‍हीही यामध्ये सहभागी होतो. असे आदित्‍य ठाकरे म्‍हणाले.

केंद्र सरकारवर टीका

कोरोना काळात नागरिकांना पुन्हा आपल्‍या प्रदेशात जायचे होते. त्‍यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारकडून वारंवार केंद्राकडे रेल्‍वेची मागणी केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दोन महिने उशिराने केंद्र सरकारने रेल्‍वे सोडल्‍या. मात्र कोरोना काळातही त्‍याला तिकीट आकारले. या तिकिटांचे पैसे राज्‍याने मुख्यमंत्री निधीतून भरले. तसेच महाराष्ट्रात नागरिकांची काळजी शिवसेनेने घेतली आहे.

हे ही वाचा  

Back to top button