या ८ सेलिब्रेटींनी ‘त्या’ चित्रपटांसाठी रात्रीत मानधन वाढवले आणि निर्मात्यांनी घरचा रस्ता दाखवला ! | पुढारी

या ८ सेलिब्रेटींनी 'त्या' चित्रपटांसाठी रात्रीत मानधन वाढवले आणि निर्मात्यांनी घरचा रस्ता दाखवला !

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड इंडस्ट्रीतील टॉप कलाकार एका चित्रपटात काम करण्यासाठी भरघोस मानधन घेतात. त्याचबरोबर अनेक अभिनेते मानधनासह चित्रपटांतून मिळालेल्या नफ्यातही वाटा मागतात. परंतु, या सेलिब्रिटींच्या भरघोस मानधनाच्या मागणीमुळे वैतागलेल्या निर्मात्यांनी त्यांना चित्रपटांमधून बाहेर काढले. अशा काही बॉलीवूड कलाकारांबद्दल आपण जाणून घेऊया….


शाहरूख खान (Shah Rukh Khan) –
बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता शाहरूख खानने पद्मावती चित्रपटात मुख्य भूमिका करण्यासाठी ९० कोटींची मागणी केली होती. परंतु निर्माता संजय लीला भन्साळी यांनी त्यांची मागणी मान्य केली नाही. त्यामुळे शाहरूख खानला या चित्रपटावर पाणी सोडावे लागले.


करिना कपूर (Kareena Kapoor) –
‘कल हो ना हो’ या चित्रपटात नैनाची भूमिका साकारण्यासाठी निर्माता करण जौहर यांनी करिना कपूरला ऑफर दिली होती. परंतु त्यासाठी करिनाने मोठ्या मानधनाची अपेक्षा ठेवल्याने अभिनेत्री प्रीती झिंटाला या चित्रपटात घेण्यात आले.

आर माधवन (R Madhavan) –
‘फन्ने खां’ या चित्रपटासाठी अभिनेते आर माधवनने भरघोस मानधन मागितले होते. त्यामुळे हा चित्रपट मिळू शकला नाही.

सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha)

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला अभिनेता सलमान खानच्या ‘किक’ चित्रपटात ऑफर मिळाली होती. परंतु सोनाक्षीने या चित्रपटासाठी मोठी रक्कमेची मागणी केल्यामुळे तिच्या हातातून हा चित्रपट निसटला.

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)
अभिनेत्री माधुरी दीक्षितने बॉलीवुडमध्ये अनेक हिट चित्रपट केले आहेत. प्रदीर्घ काळानंतर बॉलीवुडमध्ये पुनरागमन करण्यासाठी माधुरी दीक्षित ने ५ कोटींची मागणी केली होती. परंतु त्यांना भूमिका देण्यासाठी अनेक निर्मात्यांनी तयारी दर्शवली नव्हती.

नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui)
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांना ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटासाठी एक मोठी ऑफर देण्यात आली होती. त्यासाठी त्यांनी ३.५ कोटी मानधन मागितले होते. पण इतके मानधन देण्यास निर्मात्याने नकार दर्शवत त्यांना भूमिका दिली नाही.

श्रीदेवी (Sridevi)
प्रचंड गाजलेल्या ‘बाहुबली’ या चित्रपटात माहिष्मती राणी शिवगामीची भूमिका करण्यासाठी अभिनेत्री श्रीदेवी यांना विचारणा करण्यात आली होती. ही भूमिका करण्यासाठी श्रीदेवी यांनी ६ कोटींची मागणी केली होती. परंतु निर्मात्यांनी ती मान्य केली नाही.

Back to top button