नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा
पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवी पेन्शन योजना आणण्याचा विचार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ (EPFO) करीत आहे. वरील वेतन श्रेणीत मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून गेल्या काही वर्षांपासून नव्या पेन्शन योजनेची मागणी केली जात आहे.
जे कर्मचारी पेन्शन योजना 1995 मध्ये कव्हर नाहीत, त्यांच्यासाठी ही योजना राहू शकते. ईपीएफओच्या (EPFO) पुढील 11 आणि 12 मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत यासंदर्भातला नवीन पेन्शन योजनेच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. पेन्शनशी संबंधित मुद्द्यावर एका उपसमितीचा अहवाल या बैठकीत सादर केला जाणार आहे. या बैठकीत आर्थिक वर्ष 2021-22 साठीच्या व्याजदरावरही निर्णय होण्याची शक्यता आहे.
जीवन विमा पॉलिसी (Life Insurance Policy) चा प्रीमियम वेळत भरला नाही तर विमा कव्हर संपण्याचा धोका असतो. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. या काळात उद्योग ठप्प झाले होते. यामुळे अनेकांना विमा पॉलिसीचा प्रीमियम भरण्यास अडचणी आल्या. पण आता प्रीमियम भरण्याचा सुरक्षित पर्याय आहे. तो म्हणजे तुम्ही LIC चा प्रीमियम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) अकाउंटमधून भरु शकता. EPFO ने काही अटींवर ईपीएफ खात्यातून एलआयसी प्रीमियम भरण्याची मूभा दिली आहे. जीवन विमा पॉलिसी आणि EPF हे दोन्ही आर्थिक अडचणीच्या काळात कामी येतात. या दोन्हींमध्ये गुंतवणूक करण्यामुळे इन्कम टॅक्स (Income Tax) च्या सेक्शन 80C नुसार सूट मिळते.
हे ही वाचा :