ईपीएफ खाते धारकाला काढता येणार एक लाख रुपये

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ‘ईपीएफ’ने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खातेधारक केव्हाही एक लाख रुपये काढू शकेल, अशी व्यवस्था सुरू केली होती. आता इतर आजारांच्या उपचारांसाठीही ही सुविधा खुली करण्यात आली आहे.
एखादी व्यक्ती गंभीर आजाराच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल असेल आणि त्याला आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज असेल, तर ईपीएफओ खातेधारक त्याच्या खात्यात एक लाख रुपये सहज ट्रान्सफर करू शकतो. खातेधारकास कोणत्याही कागदपत्रांच्या प्रक्रियेशिवाय हे करता येणार आहे, हे विशेष! नव्या नियमामुळे कोट्यवधी ईपीएफ ओ खातेधारकांना त्याचा लाभ होणार आहे.
पूर्वी वैद्यकीय बिले सादर करावी लागत होती. आता त्याचीही गरज नाही. पीएफमधून हे पैसे मिळवण्यासाठी आधी तीन दिवस लागायचे, आता हे काम एका तासात होणार आहे.