चाळीस वर्षांमध्‍ये तब्बल १४ लग्ने; भामट्याकडून सात राज्यांतील महिलांची फसवणूक | पुढारी

चाळीस वर्षांमध्‍ये तब्बल १४ लग्ने; भामट्याकडून सात राज्यांतील महिलांची फसवणूक

भुवनेश्वर : पुढारी ऑनलाईन

ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये पोलिसांनी एका ६० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. (Crime) त्याने सात राज्यांमधील १४ महिलांशी लग्न केले. महिलांची आर्थिक  फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (Crime)

संबंधित व्यक्तीने सात राज्यांतील १४ महिलांशी लग्न केलं. ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यातील पटकुरा थाना क्षेत्रातील एक गावातील राहणाऱ्या या व्यक्तीने तथाकथित पत्नींना सोडून पळून जाण्याआधी त्या महिलांकडून पैसेदेखील घेतले आहेत. पण, अटक केलेल्या व्यक्तीने या आरोपांचे खंडन केलं आहे.

भुवनेश्वरचे पोलिस उपायुक्त उमाशंकर दास यांनी सांगितलं की, आरोपीने १९८२ मध्ये पहिलं लग्न केलं होतं. २००२ मध्ये दुसरं लग्न केलं. या दोन्ही लग्नानंतर त्याला पाच मुले झाली. २००२ ते २०२० पर्यंत त्याने मॅरेज वेबसाईटच्या माध्यमातून अन्य महिलांशी मैत्री केली. पहिल्या पत्नींना न सांगता अन्य महिलांशी विवाह केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, , तो शेवटच्या पत्नीसोबतभुवनेश्वरमध्ये राहत होता. ती दिल्लीमध्ये एका शाळेत शिक्षिका आहे. तिला त्याच्या मागील लग्नांबद्दल माहिती मिळाल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर त्या व्यक्तीला पोलिसांनी त्याच्या भाड्याच्या राहत्या घरातून अटक केली.

पोलिस उपायुक्तांच्या माहितीनुसार, आरोपी मध्यमवयीन एकट्या अशणाऱ्या महिला, विशेषत: घटस्फोटीत महिलांशी लग्न करायचा. ज्या मॅरेज वेबसाईटवर आपला जोडीदार शोधायची. पोलिसांच्या माहितीनुसार, तो व्यक्ती आपल्या पत्नी सोडून पळून जाण्याआधी पैसे घ्यायचा. पोलिसांनी त्याच्याकडून ११ एटीएम कार्ड, चार आधार कार्ड आणि अन्य कागदपत्रे जप्त केले आहेत.

त्या व्यक्तीने दिल्ली, पंजाब, आसाम, झारखंड आणि ओडिशासह सात राज्यांमध्ये महिलांची फसवणूक केलीय. त्याच्या पहिल्या दोन पत्नी ओडिशाच्या होत्या. पोलिसांच्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने आधीही हैदराबाद आणि एर्नाकुलममध्ये बेरोजगार तरुणांना धोका देणे आणि कर्ज फसवणूक केल्याने दोन वेळा अटक केली होती.

हेही वाचलं का?

Back to top button