Surabhi Hande : जय मल्हारची म्हाळसा रिअल लाईफमध्ये खूप ग्लॅमरस | पुढारी

Surabhi Hande : जय मल्हारची म्हाळसा रिअल लाईफमध्ये खूप ग्लॅमरस

पुढारी ऑनलाईन

जय मल्हारमध्ये म्हाळसाची भूमिका सुरभी हांडे (surabhi hande) या मराठमोळ्या अभिनेत्रीने साकारली आहे. सुरभी हांडे (surabhi hande) रिअल लाईफमध्ये फार सुंदर आणि ग्लॅमरस आहे. ती सध्या लाईमलाईटमध्ये नसली तरी तिच्या फॅन्सना तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी नक्कीचं आवडेल. या मालिकेत देवदत्त नागे, सुरभी हांडे आणि ईशा केसकर या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिची भूमिका गाजली होती. या मालिकेनंतर सुरभी ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत झळकली. तसंच ‘अग्गं बाई अरेच्चा 2’ या चित्रपटातही तिने छोटी भूमिका साकारली होती.

नव्या मालिकेत झळकणार

सुरभी एका नव्या मालिकेत झळकणार असल्याची माहिती समोर येतेय. सोशल मीडियावर ती ॲक्टीव्ह आहे. ती आधीपेक्षा आता खूप सुंदर दिसतेय. ती अनेकदा इन्स्टाग्रामवर फोटोशूट, व्हिडिओ अपलोड करते. तिच्या लूकमध्येही बदल झाल्याचे दिसते. सुंदर फोटोशूट आणि अनेक व्हिडिओज तिच्या इन्स्टा हँडलला पाहायला मिळतात.

सुरभीचा जन्म २० मे, १९९१ रोजी भंडारा येथे झाला. पण, तिचं बालपण जळगावमध्ये गेलं. बारावीपर्यंतचं शिक्षण जळगावमध्ये झालं. त्यानंतर ती नागपूरला आली. पुढील शिक्षण तिने नागपूरमधून घेतले. वयाच्या १६ व्या वर्षी सुरभीने कलाविश्वात पदार्पण केलं. तिने वयाच्या १६ व्या वर्षी स्वामी या नाटकातून अभिनय करिअरची सुरुवात केली होती.

बोल्ड ड्रेसमुळे झाली होती ट्रोल

सुरभीने तिच्या या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हिरव्या रंगाच्या सॅटीन लॉन्ग ड्रेसमुळे सुरभी ट्रोल झाली होती. या वेगळ्या ड्रेसमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. एका नेटकऱ्याने म्हटले होते- ‘सेम टू सेम, आमच्या घरी असाच पडदा आहे.’ दुसऱ्या एका युजरने ‘फक्त चादर’ असे म्हटले होते.

सुरभीने लक्ष्मी सैदव मंगलम या मालिकेतही काम केले आहे. यामध्ये तिने आर्वी ही व्यक्तीरेखा साकारली होती. तिने ‘स्टॅण्ड बाय’ या हिंदी चित्रपटात आणि ‘आंबट गोड’ या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारली होती. सुरभीने ‘सुगम संगीत कार्यक्रमा’साठीही ऑल इंडिया रेडिओवर काम केले आहे.

सुरभीला गाण्याची आवड आहे. दुर्गेश कुलकर्णीशी तिने विवाह केला असून मुळशी येथील ढेपेवाडा येथे त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता.

Back to top button