गुंतवणुकीच्या बहाण्याने सुमारे 200 जणांची कोट्यवधींची फसवणूक | पुढारी

गुंतवणुकीच्या बहाण्याने सुमारे 200 जणांची कोट्यवधींची फसवणूक

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शतावरी लागवड, अश्वगंधा, सर्पगंधा, अगरबत्ती उत्पादन, बेसन पीठ गिरणी, मत्स्य करार शेती अशा विविध प्रकल्पात गुंतवणुक करण्यास भाग पाडून 200 जणांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

Russia Ukraine crisis : युक्रेन सीमेवर रशियाकडून आणखी ७ हजार सैन्य तुकड्या तैनात, अमेरिकेचा दावा

नामदेव काळुराम वीर (रा. पापडे वस्ती, फुरसुंगी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर ममता मनोहर यादव (रा. के. के. मार्केट) हिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कविता ज्ञानदेव कोयले (27, रा. नवी पेठ, ओम बंगला) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्रातून घरी येणाऱ्या कामगाराला वाघाने नेले फरफटत

हा प्रकार 1 जानेवारी 2021 ते 15 सप्टेंबर 2021 दरम्यान राष्ट्र भूषण चौकातील मेगा फोर्स ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड येथे घडला. यावेळी संशयीत आरोपींनी त्यांना गुंतविलेल्या रकमेचे दामदुप्पट करून देतो म्हणून पैसे घेतल्याबाबत फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा

RBI Assistant Recruitment : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ९५० सहाय्यक पदांसाठी भरती

मुंबई ते बेलापूर प्रवास अवघ्‍या ३० मिनिटांत; वॉटर टॅक्सी सेवा सुरु

Ravi Bishnoi : रवी बिश्नोई कोण आहे? जो पहिल्या टी-२० सामन्यात बनला सामनावीर!

Back to top button