

लखनऊ; पुढारी ऑनलाईन : उत्तरप्रदेश निवडणुकीच्या ( Uttar Pradesh Election ) पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाने मंगळवारी पक्षाच्या जाहीरनाम्याची घोषणा केली. अखिलेश यादव ( Akhilesh Yadav ) यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीरनाम्यात केलेल्या अनेक आश्वासनांची माहिती दिली. अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाच्या जाहीरनाम्याद्वारे अनेक गोष्टी देणार असल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी मोफत पेट्रोल, गॅस सिलिंडर आणि वीज मोफत देण्याची मोठी घोषणा केली आहे.
उत्तर प्रदेशमधील ( Uttar Pradesh Election ) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्ष आपले जाहीरनाम्यांची घोषणा करत आहेत. यामध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध गोष्टींची प्रलोभने देत अनेक जीवनावश्यक गोष्टी मोफत अथवा सवलतीत देण्याची आश्वासने सर्वच पक्षांकडून दिली जात आहेत. काँग्रेसने देखिल आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.
समाजवादी पक्षाने देखिल जाहीरनाम्याच्या माध्यामतून मतदारांना मोठमोठी आश्वासने दिली आहेत. अखिलेश यांनी मुलींसाठी केजी टू पीजी पर्यंत शिक्षण मोफत देण्यासह उत्तरप्रदेशमधील सर्व जिल्ह्यांमध्ये समाजवादी कॅन्टीनच्या माध्यमातून १० रुपयांमध्ये जेवण देण्याची घोषणा केली. तसेच सर्व गरीब कुटुंबांना महिन्यातून दोन गॅस सिलिंडर मोफत देण्यासह महिन्यातून एकदा दुचाकी मालकांना १ लिटर पेट्रोल तर चारचाकीसाठी ३ लिटर पेट्रोल देण्याचे आश्वासन दिले आहे. शिवाय शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा देखिल जाहीरनाम्यात केली आहे.
समाजवादी पक्षाचा जाहीरनाम्याती आश्वासने ( Uttar Pradesh Election )