

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण जलमय बनले आहे. पावसाने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहर जलमय झाले असून २००२ ची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती नागरिकांना लागून राहिली आहे.
शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे.
याशिवाय शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. मुंबई- गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
तर शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत .
अधिक वाचा :
चिपळूण शहरातील जुना बाजार पूल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेले असून दिसेनासे झाले आहेत.
रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने याशिवाय कुंभार्ली घाट माथ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी शहरात आले आहे.
वाशिष्टी, शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे.
शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड, चिंचनाका मार्कंडी, बेंदर्कर आळी, मुरादपूर रोड, एसटी स्टँड ,भोगाळे ,परशूराम नगर परिसरात पाणी वाढत आहे.
अधिक वाचा :
रॉयल नगर तसेच राधाकृष्ण नगरमधील घरांमध्ये पाणी शिरले असून अनेकांच्या चारचाकी व दुचाकी पाण्याखाली आहेत.
याशिवाय अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक जण घरात अडकले आहेत.
पहाटे चार वाजल्यापासून शहरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरू लागले.
शहरालगतच्या खेर्डीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून अनेक घरे पाण्याखाली आहेत.
अधिक वाचा :
या घरातील काही लोक या पुरात अडकले असून त्यांना मदतीची प्रतीक्षा आहे.
बाजारपेठेत कमरेपर्यंत पाणी असून चिपळून खेडीमध्ये २००५ ची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती असून आता या पुराने २००५ चीपातळी गाठली आहे.
याशिवाय पावसाचा जोर वाढत असून पाणी पातळीत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
हे ही वाचा :
[visual_portfolio id="7577"]