माझ्या नादी लागाल तर करील ३०२ म्हणणाऱ्या ‘थेरगाव क्वीन’चा पोलीसांनी बाजार उठवला ! | पुढारी

माझ्या नादी लागाल तर करील ३०२ म्हणणाऱ्या 'थेरगाव क्वीन'चा पोलीसांनी बाजार उठवला !

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : इन्स्टाग्रामवर अश्लील आणि धमकीचे व्हिडीओ टाकणाऱ्या स्वयंघोषित ”थेरगाव क्‍विन”सह दोघींना अटक करण्यात आली आहे. वाकड पोलिसांनी ही कामगिरी केली.

साक्षी हेमंत श्रीश्रीमल (रा. थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या ‘थेरगाव क्‍विन’चे नाव आहे. तिच्यासह साक्षी कश्यप (रा. चिंचवड) हिला देखील अटक करण्यात आली आहे. तर, त्यांचा आणखी एक साथीदार कुणाल कांबळे (रा. गणेशपेठ, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साक्षी श्रीश्रीमल हिने इन्टाग्रामवर “थेरगाव क्‍विन’ नावाने अकाऊंट तयार केले. तिने आणि इतर दोन आरोपींनी मिळून या अकाऊंटवर अश्‍लील भाषा वापरून धमकीचे व्हिडिओ पोस्ट केले. तसेच, हे व्हिडिओ व्हाॅटसॲपसह अन्य सोशल मीडियावर देखील व्हायरल केले.

सोशल मिडियावरील ही पोस्ट पाहून समाजातील मुलामुलींची नितीभ्रष्ट होण्यास व मानसिक स्थिती बिघडविण्यास गुन्हा दाखल झालेले आरोपी कारणीभूत ठरत असल्याने त्यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 292, 294, 506, 34 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

हे ही वाचलं का ?

Back to top button