नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या (Central Government) दबावाखाली ट्विटरने फॉलोअर्सची संख्या कमी केली आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधीनी ट्विटरवर केला आहे. यासंदर्भात राहुल गांधींनी (Rahul Gandhi) थेट ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र लिहिले. यावर काँग्रेस नेत्यांच्या आरोपांना ट्विटरने उत्तर दिले आहे.
यावर, ट्विटरने उत्तर देताना सांगितले की, फॉलोअर्सची संख्या अर्थपूर्ण आणि अचूक आहे असा विश्वास प्रत्येकांना मिळायला हवा अशी आमची इच्छा आहे. परंतु ट्विटर त्याच्या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या धोरणाचे काटेकोर पालन करते.
ट्विटरच्या सांगितले की, आम्ही स्पॅम आणि दुर्भावनापूर्ण ऑटोमेशन विरुद्ध कारवाई करत आहोत. ट्विटरकडून (Twitter) चांगली सेवा देण्याकारिता आणि विश्वासार्ह कार्यरत असल्याची खात्री करण्यासाठी सतत प्रयत्न केले जात असल्याने, फॉलोअर्सच्या संख्येत चढ-उतार होऊ शकतात.
राहुल गांधी यांनी डिसेंबरमध्ये ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र लिहिले होते. त्यामध्ये ते म्हणाले की, सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उदारमतवादी लोकशाही आणि हुकूमशाही यांच्यात वैचारिक लढाई सुरू आहे. त्यामुळे ट्विटरसारख्या अनेक सोशल मीडिया कंपन्यांची जबाबदारी आणखी वाढते, पण ट्विटरकडून माझ्या फॉलोअर्सची वाढ थांबवली आहे, हे मात्र धक्कादायक आहे.
तसेच, पुढे बोलताना ते म्हणाले, सध्या माझे ट्विटरवर 20 मिलियन फॉलोअर्स आहेत. माझे ट्विटर खाते सक्रिय आहे आणि गतवर्षी जुलै 2021 मध्ये, दररोज माझे आठ ते दहा हजार फॉलोअर्स वाढत होते. परंतु अचानक ऑगस्ट महिन्यात फॉलोअर्सच्या संख्येत मोठी घट झाली होती. आणि हा योगायोग असावा कारण याच महिन्यात मी दिल्लीतील बलात्कार पीडितेचा मुद्दा उपस्थित केला होता. आणि त्यावर सरकारशी मानवाधिकार मुदृाावर भांडलो होतो. यामुळे सरकारच्या दबावाखाली येऊन ट्विटरने फॉलोअर्सची संख्या कमी केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
हे ही वाचलं का