दुर्गम किश्तवाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात प्रजासत्ताक दिन साजरा; मराठा लाईट इन्फंट्रीचा उपक्रम - पुढारी

दुर्गम किश्तवाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात प्रजासत्ताक दिन साजरा; मराठा लाईट इन्फंट्रीचा उपक्रम

श्रीनगर : पुढारी ऑनलाईन :  मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी किश्तवाड येथील धूल येथे प्रजासत्ताक दिन साजरा केला. हा भाग ५ डिग्री सेल्सियसपेक्षा कमी तापमान आणि अतिदुर्गम अशा स्थितीत आहे.  हा भाग किश्तवाड जम्मू काश्मीरमधील सीमावर्ती भाग असून येथील धूल हा परिसर अतिदुर्गम असा आहे. समुद्र सपाटीपासून ५६०० फूट इतक्या उंचीवर हा परिसर आहे.

मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी झांजपथक या पारंपरिक वाद्याचा गजरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत प्रजासत्ताक दिन साजरा केला. महाराष्ट्रातील पारंपरिक वाद्यांच्या गजरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह द्विगुणीत झाला. धूल येथील ग्रामस्थ आणि सरपंच देखील या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. प्रजासत्ताक दिन आणि जोडीने मराठी परंपरा असा वेगळा संगम या निमित्ताने धूल येथील ग्रामस्थांना अनुभवता आला.

तसेच, या कार्यक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. तसेच दुर्गम भागात आणि प्रतिकूल वातावरणात जवानांनी उत्साहाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यात ग्रामस्थही सहभागी झाले.

Back to top button