

पणजी : पुढारी वृत्तसेवा
कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामूळे गोवा सरकारने ( Goa govt ) शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. विधानसभा निवडणूका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार कोणत्याही प्रकारचा धोका प्रत्कारण्यास तयार नाही. यामूळे निवडणूक
संपल्यानंतर 15फेब्रुवारी रोजी राज्यातील शाळा सुरु करण्यात येणार असलयाचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी शासनाने याबाबत रविवारी नवीन नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. याशिवाय कॅसिनो , चित्रपटगृहे, रिव्हर क्रूझ, वॉटरपार्क आणि करमणूक पार्क ५० टक्के क्षमतेने खुली राहणार आहेत. कॅसिनोसह चित्रपटगृहे , रिव्हर क्रूझ, वॉटरपार्क, करमणूक पार्क, स्पा, मसाज पार्लर्स , रेस्टोरंट, पब, जिम, सभागृह ,लग्नाचे सभागृह इत्यादीमध्ये प्रवेशासाठी कोविडच्या दोन लसीचे प्रमाणपत्र अथवा २४ तास आधी केलेला नकारात्मक आरटीपीसीआर अहवाल असणे बंधनकारक आहे.
शाळा , महाविद्यालये बंद असून ऑनलाईन वर्ग घेण्यासाठी शिक्षकांना उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच या काळात परीक्षा असतील तर महाविद्यालय आणि अन्य उच्च शिक्षण संस्था सुरू राहतील. तसेच, याकाळात आरोग्य खाते, शिक्षण संस्था यांनी १५ ते १८ वर्षांच्या मुलांचे लसीकरण करावे असेही त्यामध्ये नमूद करण्याज आले आहे. इंडोर सभागृह, मंडप , खुल्या जागा ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. तसेच निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या क्षमतेनेच सुरु राहतील, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मंगळवारपासून शाळा सुरु होणार आहेत. तर कर्नाटकातही १५ जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत.
हेही वाचलं का?
पाहा व्हिडीओ :