चिंताजनक! कर्नाटकात १० वर्षाखालील मुलांमध्ये कोरोना वाढला, जानेवारीत १२०० हून अधिक मुले पॉझिटिव्ह | पुढारी

चिंताजनक! कर्नाटकात १० वर्षाखालील मुलांमध्ये कोरोना वाढला, जानेवारीत १२०० हून अधिक मुले पॉझिटिव्ह

बंगळूर; पुढारी ऑनलाईन

कर्नाटकात १० वर्षांखालील मुले कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. चालू जानेवारी महिन्यात आतापर्यंत असे १२,८७६ रुग्ण आढळून आले आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये कोरोनाचे असे ३७६ रुग्ण आढळून आले होते. नोव्हेंबरमध्ये हे प्रमाण ३३२ एवढे होते. पण जानेवारी २०२२ या एका महिन्यात रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

जानेवारी २०२२ मधील रुग्णांचे प्रमाण हे जुलै ते डिसेंबर २०२१ दरम्यानच्या सहा महिन्यांच्या कालावधील एकूण रुग्णसंख्येपेक्षा अधिक आहे. राज्यात गेल्या सहा महिन्यांत दहा वर्षाखालील ७,२४६ मुलांना कोरोना संसर्ग झाल्याचे दिसून आले होते, तर नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या जानेवारी महिन्यात (महिना पूर्ण होण्यासाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत) रुग्णसंख्येत ७७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
राज्य कोविड-१९ वॉर रूममधील आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते २२ जानेवारी २०२२ दरम्यान दहा वर्षाखालील १२,८७६ मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहेत. याचा अर्थ की दररोज सरासरी ५८५ हून अधिक मुलांना कोरोनाची लागण होत आहे.

संबंधित बातम्या

मुलांना कोरोना संसर्ग होत असल्याचे प्रमाण वाढत असतानादेखील आरोग्य विभागाने संसर्ग सौम्य स्वरुपाचा असल्याचा दावा केला आहे. रुग्णालयात दाखल होण्याचे आणि मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. याचाच अर्थ की कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात असल्याचेही आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पहिल्या डोसची १०० टक्के उद्दिष्टपूर्ती करणारे कर्नाटक पहिले राज्य

कर्नाटकात कोरोनाचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण झाले आहे. ही कामगिरी करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. दुसरा डोसही ८५ टक्के लोकांना देण्यात आला आहे. आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी रविवारी ही माहिती दिली. १८ वर्षांवरील सुमारे ४ कोटी लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

पत्रकारांशी बोलताना डॉ. सुधाकर म्हणाले, की कोरोना लसीकरणामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटक आघाडीवर आहे. आरोग्य कर्मचारी, इतर कोरोना योद्धे, डॉक्टरांमुळे राज्यामध्ये पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासह सर्व खात्यांतील अधिकार्‍यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले.

महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये रुग्णसंख्या व संसर्ग प्रमाण घटत आहे. आतापर्यंत कर्नाटकात एकूण ६ कोटी कोरोना चाचण्या केल्या आहेत. संपूर्ण देशात या बाबतीत कर्नाटक तिसर्‍या स्थानावर आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कोल्हापूर महापालिकेचा सफाई कर्मचारी ठरला संकटातील प्राण्यांचा ‘दादा’

Back to top button