युरोपमध्‍ये लवकरच होणार कोरोना महामारीचा अंत : 'डब्‍ल्‍यूएचओ'चा दावा | पुढारी

युरोपमध्‍ये लवकरच होणार कोरोना महामारीचा अंत : 'डब्‍ल्‍यूएचओ'चा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
कोरोना महामारीने मागील दोन वर्ष संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाचा नवा व्‍हेरियंट ओमायक्रॉनच्‍या वाढत्‍या संसर्गामुळे अनेक देशांमध्‍ये पुन्‍हा निर्बंध लादण्‍यात आले आहेत. अशा परिस्‍थितीमध्‍ये आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. युरोममध्‍ये काही दिवसांमध्‍येच कोरोना महामारीचा अंत होईल, असा दावा जागतिक आरोग्‍य संघटनेचे (डब्‍ल्‍यूएचओ) युरोपमधील संचालक हंस क्‍लूज यांनी केला आहे.

युरोपची वाटचाल कोरोना महामारी अंत होण्‍याच्‍या दिशने

वृत्तसंस्‍था ‘एएफपी’ला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये क्‍लूज यांनी म्‍हटलं आहे की, कोरोनाचा नवा व्‍हेरियंट ओमायक्रॉनचा संसर्ग हा मार्च २०२२पर्यंत युरोपमधील ६० टक्‍क्‍यांहून अधिक नागरिकांना झाला असेल. त्‍यामुळे नागरिकांमध्‍ये कोरोना विषाणूविरोधात लढण्‍याची शक्‍ती वाढेल. त्‍याचबरोबर लसीकरणाचा वेगही कायम राहणार आहे. त्‍यामुळे यानंतर काही आठवड्यांमध्‍येच कोरोना संसर्गाचा दर झपाट्याने ओसरेल, असेही क्‍लूज यांनी म्‍हटले आहे. यानंतर कोरोनाचा नवा व्‍हेरियंट ओमायक्रॉनमुळे युरोप देशांमधील कोरोना महामारी एका नव्‍या टप्‍प्‍यावर पोहचलेला असेल. यानंतर तिचा अंत होईल. मात्र यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. एवढे नक्‍की की, युरोपमध्‍ये कोरोनाचा अंत होण्‍याची वाटचाल सुरु झाली आहे.

अमेरिकेचे ज्‍येष्‍ठ शास्‍त्रज्ञांनीही दिला कोरोना महामारी हाेण्‍याचे संकते

अमेरिकेचे ज्‍येष्‍ठ शास्‍त्रज्ञ ॲथनी फॉसी यांनी रविवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍येही अशाच प्रकारचे संकेत दिले आहेत. त्‍यांनी म्‍हटलं आहे की, अमेरिकेतील काही राज्‍यांमध्‍ये कोरोना संसर्ग झपाट्याने कमी होत आहे. ही खूपच सकारात्‍मक बाब आहे. अमेरिकेतील पूर्वोत्‍तर राज्‍यांमधील रुग्‍णसंख्‍येतील कमी राहिली तर संपूर्ण अमेरिकेतील कोरोना रुग्‍णसंख्‍या कमी होईल, असा विश्‍वास फॉसी यांनी व्‍यक्‍त केला आहे. यापूर्वीही कोरोनाच्‍या पहिल्‍या लाटेमध्‍ये अमेरिकेला सर्वाधिक तडाखा बसला होता. येथे सर्वाधिक रुग्‍णांचा मृत्‍यूची नोंद झाली होती. त्‍यामुळे फॉसी यांनी व्‍यक्‍त केलेला विश्‍वास अमेरिकेसह संपूर्ण जगाला दिलासा देणारा ठरला आहे.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडीओ :

 

 

Back to top button