अनोखा विवाह सोहळा! ८५ वर्षीय आजोबा आणि ६५ वर्षीय आजी बनले नवदाम्पत्य | पुढारी

अनोखा विवाह सोहळा! ८५ वर्षीय आजोबा आणि ६५ वर्षीय आजी बनले नवदाम्पत्य

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा; बंगळूर येथे एका ८५ वर्षीय आजोबा आणि ६५ वर्षीय आजीचा एका आगळा -वेगळा विवाह ( marriage ) पार पडला आहे. या अनोख्या विवाहाने सर्वाना आश्चर्यचकित केले आहे. उतारवयातील आजोबा-आजीने नवदाम्पत्य जीवनात प्रवेश केला. म्हैसुरातील गौसियानगरात ही घटना घडली.

मुस्तफा (८५ वर्षीय) आणि फातिमा बेगम ( ६५ वर्षीय ) विवाहबद्ध ( marriage ) झाले. म्हैसुरातील उदयगिरीतील ते रहिवासी आहेत. आपली मुले, कुटुंबातील इतर सदस्यांच्या उपस्थितीत या दाम्पत्याने विवाह केला. मेंढीपालन करून उदरनिर्वाह करणार्‍या मुस्तफाला ९ मुले आहेत. त्या सर्वांचे लग्न झाले आहे. दोन वर्षांपूर्वी पत्नी खुर्शीद बेगमचा मृत्यू झाला.

गौसियानगरात एकाकी जीवन जगणार्‍या फातिमा बेगम यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. फातिमा यांची चौकशी करून त्यांच्याशी विवाहबद्ध होण्याचे मुस्तफा यांनी सांगितले. त्यांना होकार मिळाला. हा निर्णय त्यांनी मुलांना सांगितला. यानंतरच रितसर लग्न केलं.

हेही वाचलंत का? 

Back to top button