#GoaElections : गोव्यात भाजपनं माजी मुख्यमंत्र्यांसह अनेकांचा पत्ता केला कट, पक्ष प्रवेश केलेल्यांना दिलं तिकीट | पुढारी

#GoaElections : गोव्यात भाजपनं माजी मुख्यमंत्र्यांसह अनेकांचा पत्ता केला कट, पक्ष प्रवेश केलेल्यांना दिलं तिकीट

पणजी: पुढारी वृत्तसेवा

#GoaElections : भाजपने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान, पणजी मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना उमेदवारी नाकारली. मांद्रे मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनाही भाजपने उमेदवारी दिलेली नाही.

पर्ये मतदारसंघातून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या पत्नी दिव्या यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री यांना मात्र सांगे मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली नाही. मागील निवडणुकीत पराभूत झालेले गणेश गावकर, सुभाष फळदेसाई, रमेश तवडकर, दयानंद मांद्रेकर यांना भाजपने या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. विधानसभेचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक प्रभू पाऊसकर यांनाही भाजपने उमेदवारी दिलेली नाही. वेळ्ळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे जलसंपदामंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स यांना आता भाजप सोडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यांच्या मतदारसंघातही अन्य उमेदवार भाजपने निश्चित केला आहे.

अन्य पक्षातून आणि ज्या अपक्षांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांना मात्र उमेदवारी देण्यात आली आहे.

#GoaElections : भाजपने जाहीर केलेले उमेदवार असे : दयानंद सोपटे (मांद्रे), प्रवीण आर्लेकर (पेडणे), नीळकंठ हळर्णकर (थिवी), दयानंद मांद्रेकर (शिवोली), जयेश साळगावकर (साळगाव), रोहन खंवटे( पर्वरी), ग्लेन टिकलो (हळदोणे), आतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात (पणजी), जेनिफर मोन्सेरात ( तासगाव), फ्रांसिस सिल्वेरा (सांतआंद्रे), प्रेमेंद्र शेट (मये), डॉ. प्रमोद सावंत (साखळी), डॉ. दिव्या राणे ( पर्ये), गोविंद गावडे (प्रियोळ), रवी नाईक (फोंडा), सुभाष शिरोडकर सुभाष ( शिरोडा), सुदेश भिंगी (मडकई), मिलिंद नाईक (मुरगाव), कृष्णा उर्फ दाजी साळकर (वास्को), माविन गुदिन्हो (दाबोळी), दत्ता बोरकर (नुवे), दामोदर नाईक (फातोर्डा), उल्हास तुयेकर (नावेली), मनोहर उर्फ बाबू आजगावकर (मडगाव), दामोदर बांदोडकर (बाणावली), क्लाफासियो डायस (कुंकळ्ळी), सावियो रॉड्रिग्ज (वेळ्ळी), चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर (केपे), निलेश काब्राल (कुडचडे), गणेश गावकर (सावर्डे), सुभाष फळदेसाई (सांगे) आणि रमेश तवडकर (काणकोण).

हे ही वाचा :

 

Back to top button