Animal Health : प्राण्यांवरील पहिली कोरोना लस तयार! २३ लष्करी कुत्र्यांवरील ट्रायल यशस्वी  | पुढारी

Animal Health : प्राण्यांवरील पहिली कोरोना लस तयार! २३ लष्करी कुत्र्यांवरील ट्रायल यशस्वी 

पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणातील हिसार येथे असणाऱ्या केंद्रीय अश्व संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी प्राण्यासाठी देशातील पहिली कोरोनावरील लस (Animal Health) तयार करण्यात यश मिळवलं आहे. लष्कराच्या २३ कुत्र्यांवर याचा प्रयोग करण्यात आला आहे. कोरोनाची लस दिल्यानंतर २१ दिवसांनंतर कुत्र्यांच्या शरीरात कोरोनाच्या विरोधातील एंटीबाॅडीज दिसून आल्या आहेत.

कुत्र्यांवरील कोरोनाच्या लसीचे प्रयोग यशस्वी झाल्यामुळे गुजराजमध्ये असणाऱ्या जुनागढमधील सक्करबाग जूलाॅजिकल पार्कमधील १५ सिंहांवर प्रयोग (Animal Health) करण्यात येणार आहे. गुजरात सरकारची परवानगी मिळल्यानंतर हा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यानंतर प्राण्यांवरील कोरोनाची लस आणून प्राण्यांचं लसीकरण होण्याची शक्यता आहे.

डेल्टा व्हेरियंटमुळे एक सिंहाचा मृत्यू, त्यामुळे डेल्टा स्ट्रेनचा प्रयोग

प्राण्यांवरील कोरोनाची लस तयार करणाऱ्या संशोधन संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ डाॅ. नवीन कुमार यांनी सांगितलं की, “सार्स कोरोना विषाणू हा कुत्री, मांजरं, सिंह, चित्ता, बिबट्या, हरीण या प्राण्यांमध्ये प्रामुख्याने आढळून आला आहे. काही दिवसांपूर्वी चैन्नईमधील प्राणी संग्रहालयातील   मृत्यू पावलेल्या सिंहाच्या शरीरात कोरोनाचे विषाणू आढळले हाेते. तपासणीत आढळले की, त्या सिंहाचा कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे माणसात आढळणाऱ्या डेल्टा व्हेरियंटला आयसोलेट करून त्याचा वापर प्राण्यांवरील लस निर्मितीसाठी केला.

अमेरिका आणि रशियामध्ये प्राण्यांवरील लस विकसित होऊन त्याचा वापर सुरु देखील झाला आहे.  संशोधन संस्थेकडून तयार केलेल्या लसीची कुत्र्यांवरील ट्रायल यशस्वी ठरली आहे. सिंहावर त्याची ट्रायल करण्यासाठी सेंट्रल जू अथाॅरिटीने परवानगी दिली आहे आणि स्टेट चीफ वाइल्ड वार्डनच्या परवानगीची आवश्यता आहे, असंही शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आलं आहे.

हे वाचलंत का? 

Back to top button