पुढारी ऑनलाईन डेस्क
देशातील ख्यातनाम उद्योगपती, 'महिंद्रा ॲण्ड महिंद्रा'चे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच ॲटिव्ह असतात. विविध क्षेत्रात सर्वसामान्यांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी, हटके संशोधन याचे व्हिडीओ ते ट्विटरवर शेअर करत असतात. आजवर त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन अनेक प्रेरणादायी व्हिडीओ शेअर करत विविध क्षेत्रातील दुर्लक्षित प्रतिभावंताची ओळख करुन दिली आहे. त्यांनी आज 'जीवनात आनंदी कसे राहाल?', या प्रश्नाचे उत्तर देणार्या चिमुकल्याचा व्हिडीओ शेअर केला. चिमुकल्याने आपल्या निरागस भावनेतून दिलेला संदेश खूपच प्रभावी असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला चिमुकल्याचा व्हिडीओ हा आनंदी जगण्याच तत्वज्ञान खूप सोप्या भाषेत सांगतो. हा व्हिडीओ २०१८मधील आहे. प्रेरणादायी संदेश देणार्या चिमुकल्याचे नाव आहे प्रेम रावत. त्याने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, त्याने प्रश्न केला आहे की, तुम्ही जीवनात काेणत्या गोष्टीचा सराव करता? तुम्ही ज्या गाेष्टींचा सराव करात तेच तुमच्या आयुष्यात घडतं. तुम्ही काळजी, चिडचीड, शुल्लक गाेष्टींच्या सातत्याने तक्रारी करत असाल तर तुमचं आयुष्यही काळजी, चिडचीड, तक्रारी आणि राग यानेच भरलेले असेल. तुम्हाला आनंदी राहायचा का? तर मग आनंदी राहण्याचा सराव करा. सतत आनंदी रहा. हा सराव तुम्ही केल्यास तुमचं आयुष्यही आनंदाने भरुन जाईल.
आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे की, लहान मुलगा प्रेम रावत तुम्हाला विचारतोय, तुम्ही दररोज कशाचा सराव करता. तो कोणी आध्यात्मिक गुरु नाहीय. मात्र कोणतेही लहान मुल बोलते तेव्हा त्यांचा निरागस भाव हा मोठा प्रभाव टाकणार असतो. प्रेम रावत याचा संदेश हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
हेही वाचलं का?