x-ray : आता एक्‍स रेच्‍या माध्‍यमातून होणार कोरोना चाचणी - पुढारी

x-ray : आता एक्‍स रेच्‍या माध्‍यमातून होणार कोरोना चाचणी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
जगावर सध्‍या कोरोनाचा व्‍हेरियंट ओमायक्रॉनचे संकट आहे. काही देशांमध्‍ये रुग्‍णसंख्‍येत माेठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्‍यामुळे कोरोना चाचणीचे प्रमाणही वाढले आहे. नुकताच वेस्‍ट स्‍कॉटलंड विद्‍यापीठातील शास्‍त्रज्ञांनी एक्स-रेच्‍या (X-ray) माध्‍यमातून कोरोना चाचणीचा प्रयोग केला. याला कमालीचे यशही मिळाले आहे. या चाचणीचे ९८ टक्‍के परिणाम हे योग्‍य असल्‍याचे निरीक्षण शास्‍त्रज्ञांनी नोंदवले आहे. या चाचणीसाठी आर्टिफिशियल इंटेजिलन्‍सचा (कृत्रिम प्रज्ञा) वापर करण्‍यात आला आहे.

पाच ते दहा मिनिटांमध्‍ये होणार चाचणी

वेस्‍ट स्‍कॉटलंड विद्‍यापीठातील शास्‍त्रज्ञांनी कोरोना एक्स-रे चाचणीबाबत म्‍हटलं आहे की, रिव्‍हर्स ट्रान्‍सकिप्‍शन पॉलीमर्स चेन रिॲक्‍शन (आरटी-पीसीआर ) चाचणीपेक्षाही या चाचणीचा अहवाल लवकर प्राप्‍त होतो. केवळ ५ ते १० मिनिटांमध्‍ये संबंधित रुग्‍णाला कोरोनाची लागण झाली आहे का? याची माहिती मिळू शकते. तसेच एक्‍स-रे चाचणीच्‍या माध्‍यमातून कोरोनाचा ओमायक्रॉन व्‍हेरियंटची लागण झाली आहे का? याचीही माहिती मिळेल, असेही शास्‍त्रज्ञांनी स्‍पष्‍ट केले आहे.

Back to top button