Arunachal Pradesh : चीनची पुन्हा कुरघोडी; भारतीय सीमेमध्ये घुसून अल्पवयीन मुलाचं केलं अपहरण - पुढारी

Arunachal Pradesh : चीनची पुन्हा कुरघोडी; भारतीय सीमेमध्ये घुसून अल्पवयीन मुलाचं केलं अपहरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनने पुन्हा एकदा कुरघोडी केलेली आहे. आरोप असा आहे की, चीनची पीपल्स लिब्रेशन आर्मी (PLA) ने भारतीय सीमेमध्ये घुसून एका मुलाचे अपहरण केलं आहे. पीएलएवर अरुणाचल प्रदेशच्या (Arunachal Pradesh) अप्पर सियांग जिल्ह्यातील एका १७ वर्षांच्या मुलाचं अपहरण करण्याचा आरोप करण्यात आला आहे. बुधवारी प्रशासनाने भारतीय सीमेवरून मुलाचं अपहरण केल्याची माहिती दिली आहे.

अपहरण करण्यात आलेल्या मुलाचं नाव मिराम तारोन सांगितलं जात आहे. मिराम तारोन हा जिडो गावातील रहिवाशी आहे. जिल्हा प्रशासनाचं म्हणणं आहे की, मिरामचं मंगळवारी अपहरण करण्यात आलं आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर जी शिकारी टोळी आहे, त्याचा मिराम तारोन हा एक सदस्य आहे. शिकार करत असतानाच त्याचं अपहरण करण्यात आलं होतं.

जिल्ह्याचे अतिरिक्त आयुक्त शास्वत सौरभ म्हणाले की, “हा तरुण स्थानिक शिकाऱ्यांच्या टोळीमधील एक आहे. त्या टोळीकडून असं सांगण्यात आलं आहे की, भारतीय सीमेवरून पीएलएने अपहरण केलं आहे. जेव्हा आम्हाला यासंदर्भात माहिती मिळाली, आम्ही तातडीने उपस्थित भारतीय लष्कराला त्याची माहिती दिली. मुलाला लवकरात लवकर सोडवून आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.”

भाजप खासदाराने मागितली मदत 

भारतीय जनता पार्टीचे अरुणाचल ईस्टचे (Arunachal Pradesh) खासदार तापिर गाओ यांनी यांसदर्भात ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी भारतीय एजन्सींजना मदत मागितली आहे. संबंधित मुलाला त्वरीत सोडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या खासदारांनी असंही सांगितलं आहे की, “अपहरण झालेल्या मुलाचा एक मित्र या अपहरणाच्या जाळ्यातून सुटून आला आहे आणि त्यानेच प्रशासनाला ही माहिती दिली आहे.

Back to top button