नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी ( Punjab Election 2022 ) आम आदमी पार्टी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करणार का, या प्रश्नाचे उत्तर आज पक्षाच्या वतीने आज देण्यात आले. पक्षाचे संगरुरचे खासदार भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर केले आहे, मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कोणा आसावा, अशी विचारणा आपने दिल्लीतील नागरिकांना केली होती. फोन आणि व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून २१ लाख नागरिकांनी आपले मत नोंदवले. यामध्ये भगवंत मान यांचे नाव सर्वात आघाडीवर होते. टेलीव्होटमध्ये मान आघाडीवर राहिल्याने मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
भगवंत मान यांनी २०११ आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. पंजाबमधील विनोदी कलाकार अशी त्यांची ओळख होती. पसिद्ध विनोदी टीव्ही कलाकार कपिल शर्मा यांचया द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्येही ते सहभागी झाले होते. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्यांनी बॉ कॉमच्या प्रथम वर्गाला प्रवेश घेतला मात्र नंतर त्यांनी शिक्षण सोडून दिले.
एका मुलाखतीमध्ये मान यांनी म्हटलं होतं की, विनोदी कलाकार असतान मी कुटुंबाला खूप वेळ देत होतो. मात्र २०१४मध्ये लोकसभा निवडणूक जिंकली. यानंतर राजकारणात पूर्णवेळ व्यस्त राहिला. पत्नी आणि मुलांना वेळच देता येत नव्हता. यामुळे २०१५मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांची पत्नी आणि दोन मुले अमेरिकेमध्ये वास्तव्यास आहेत. तर मान हे दिल्ली आणि पंजाबमध्ये वास्तव्यास असतात. आता पंजाब राज्यातील नागरिकच माझे कुटुंब असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
मान यांनी २०१२मध्ये पंजाब विधानसभा निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांनी आपला एकूण संपत्ती १.५५ कोटी रुपये दाखवली होती. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत संपत्ती १.९९ कोटी झाली. यावेळी मान यांनी दीड लाखांची रोकड, ११.३१ लाख बॅकेतील ठेवी, ४१.२५ लाख रुपयांच्या दोन कार इतकी मालमत्ता होते. तसेच १७ लाखांचे दागिने, ५२ लाखांची जमीन, ६९ लाख रुपयांची व्यावसायिक जमीन, २.२५ कोंटी रुपयांचे राहते घर. २०१९च्याा लोकसभा निडणुकीत अर्ज दाखल करताना त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यामध्ये त्यांच्या संपत्तीत घर झाल्याचे दिसून आले.
हेही वाचलं का?