Oxfam Report : गरीबी संपत नसते ! देशात ८४ टक्के कुटुंबाचे उत्पन्न घटले, पण अब्जाधिश वाढले | पुढारी

Oxfam Report : गरीबी संपत नसते ! देशात ८४ टक्के कुटुंबाचे उत्पन्न घटले, पण अब्जाधिश वाढले

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : कोरोना महामारीच्या काळात अगोदरच सामान्य लोकांची आणि नोकरदारांची परिस्थिती बिकट झालेली आहे. ‘ऑक्सफेम’च्या (Oxfam Report) अहवालात प्रत्यक्ष देशातील नागरिकांचे उत्पन्न किती घटले? गरिबी आणि श्रीमंतीची विषमता याची स्पष्ट कल्पना येणारी आकडेवारी नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामध्ये २०२१ या वर्षांमध्ये भारतातील ८४ टक्के कुटुंबांचे उत्पन्न घटले आहे. पण, त्याचबरोबर २०२१ मध्ये देशात अब्जाधिशांची संख्या १०२ वरून १४२ वर गेलेली आहे.

या अब्जाधिशांच्या संख्या केवळ एका वर्षांत ४० ने वाढली आहे. पहिल्या १०० अब्जाधिशांची एकूण संपत्ती ही ७२० अब्ज डाॅर्लसवर म्हणजेच ५७.३ लाख करोड इतकी आहे. अहवाल असं सांगतो की, कोरोना महामारीच्या काळात (मार्च २०२०-नोव्हेंबर २०२१) या अब्जाधिशांची संपत्ती २३.१४ लाख करोड रुपयांवरून वाढून ती ५३.१६ करोड रुपयांपर्यंत गेली आहे. विशेष हे की, हा ऑक्सफेमचा अहवाल ‘इनइक्वॅलिटी किल्स’ इकोनाॅमिक फोरमच्या दावोस अजेंडा कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदर रविवारी प्रकाशित झाली.

Oxfam Report : अब्जाधिशांच्‍या यादीत भारत तिसर्‍या स्‍थानी

ऑक्सफेमच्या अहवालानुसार (Oxfam Report) चीन, अमेरिका यांच्यानंतर भारत हा तिसरा असा देश आहे. ज्यामध्ये अब्जाधिशांची संख्या सर्वांत जास्त आहेत. फ्रान्स, स्वीडन, स्वित्झर्लंडच्या तुलनेत २०२१ मध्ये भारतात अब्जाधिशांच्या संख्येत ३९ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. इतकंच नाही तर, या १०० अब्जाधिशांच्या कुटुंबांच्या संपत्तीमध्ये सर्वात जास्त म्हणजे एकूण संपत्तीचा पाचवा भाग हा केवळ अदाणी ग्रुपकडे आहे.

ऑक्सफेम इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ बेहर म्हणाले की, “ऑक्सफेमची आकडेवारी देशातील विषमतेची वास्तविकता अधोरेखित करते. याचा अर्थ असा आहे की, दिवसभरात तब्बल २१ हजार लोकांचा मृत्यू होता. दुसऱ्या भाषेत सांगयाचं झालं तर प्रत्येक चौथ्या सेकंदाला एका व्यक्तीचा मृ्त्यू होत आहे. या महामारीच्या दरम्यान लैंगिक समानतेला ९९ वर्षांवरून १३५ वर्षे मागे ढकललं आहे. महिलांच्या एकूण उत्पन्नातील ५९.११ लाख करोड रुपयांचं नुकसान झालं आहे.”

हेही वाचलं का?

Back to top button