freshers jobs : अपडेट करा CV ! देशातील TOP 3 कंपन्यांमध्ये फ्रेशर्ससाठी जम्बो भरती | पुढारी

freshers jobs : अपडेट करा CV ! देशातील TOP 3 कंपन्यांमध्ये फ्रेशर्ससाठी जम्बो भरती

पुढारी ऑनलाईन डेस्क

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण तरुणींसाठी (freshers jobs) आनंदाची बातमी आहे. या वर्षी आयटी क्षेत्रात नोकरभरतीचा ओघ वाढण्याची अपेक्षा आहे. इन्फोसिसपासून विप्रोपर्यंत मोठ्या आयटी कंपन्या फ्रेशर्सना नोकऱ्या देतील. (freshers jobs)

खरं तर, डिसेंबर २०२१ च्या शेवटच्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना, आयटी कंपन्या इन्फोसिस आणि विप्रो यांनी नोकरभरतीबद्दल घोषणा केली आहे. तथापि, दोन्ही कंपन्यांनी तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे २६ हजार जणांना नोकरी दिली आहे.

freshers jobs :  wipro नोकऱ्या देणार

विप्रोने पुढील वर्षापर्यंत ३० हजारांवर फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची योजना आखली आहे. कारण attrition rate (कंपनी सोडणाऱ्या लोकांची संख्या) २२ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. कंपनी मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात ७० टक्के अधिक फ्रेशर्सची नियुक्ती करेल. भारतीय आयटी कंपन्यांच्या गेल्या एका वर्षात अ‍ॅट्रिशनमध्ये वाढ होत आहे.

कंपनीने म्हटले आहे की नोकरी सोडल्याने अधिक कर्मचारी खर्च होतात आणि मार्जिन कमी होते. अलीकडच्या काही महिन्यांत भारतातील सर्व टेक कंपन्यांसाठी ही समस्या आहे. डिसेंबर तिमाहीत विप्रोचा एक्झिट रेट सर्वाधिक होता. विप्रोने या तिमाहीत १० हजार ३०६ कर्मचार्‍यांची वाढ नोंदवली आणि त्यांची एकूण संख्या २ लाख ३१ हजार ६७१ वर नेली. मागील वर्षीच्या तुलनेत यात ४१ हजार ३६३ ने वाढ झाली आहे.

freshers jobs : इन्फोसिस सुद्धा नोकरी देणार

डिसेंबर २१ ला संपलेल्या तिमाहीत आपल्या कमाईची घोषणा करताना, भारतातील दुसरी सर्वात मोठी IT कंपनी Infosys ने आपल्या चालू आर्थिक वर्षासाठी ५५ हजारहून अधिक फ्रेशर्सना नियुक्त करण्याची योजना आखत असल्याचे सांगितले आहे.

कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) निलांजन रॉय म्हणाले, आम्ही प्रतिभा शोधत आहोत आणि आमच्या ग्लोबल हायरिंग प्रोग्रामचा एक भाग म्हणून आम्ही चालू वर्षात ५५ हजारहून अधिक भरती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

TCS कडून गेल्या तीन महिन्यांत २८ हजारांवर नोकऱ्या

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), ज्यांची कर्मचारी संख्या अलीकडे पाच लाखांच्या पार गेली आहे. टीसीएस सुद्धा तंत्रज्ञानातील प्रतिभा शोधत आहे. टीसीएसने यापूर्वी येत्या मार्चपर्यंत ३४ हजार अतिरिक्त फ्रेशर्सची नियुक्ती करणार असल्याचे सांगितले होते, परंतु डिसेंबरपर्यंत ते लक्ष्य पूर्ण केले आहे. व्यवस्थापनाने मात्र येत्या काही महिन्यांत आणखी नियुक्त्या केल्या जातील असे सांगितले आहे. TCS ने डिसेंबरला संपलेल्या तिमाहीत 15.3% एट्रिशन रेट नोंदवला आहे, जो विप्रो (22.7%) आणि इन्फोसिस (25%) च्या तुलनेत सर्वात कमी आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत २८ हजार नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button