UP Elections 2022 : 'भाजपने योगींना निकाल लागण्याच्या आधीच गोरखपूरला पाठवून दिले!' | पुढारी

UP Elections 2022 : 'भाजपने योगींना निकाल लागण्याच्या आधीच गोरखपूरला पाठवून दिले!'

लखनऊ/नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

उत्‍तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री आदित्‍यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्‍यांचा पक्ष निवडणुकीच्या निकालाच्या आधीच त्‍यांना गोरखपूरला पाठवत आहे. आता योगींनी तिथेच रहावे तेथून इकडे येण्याची गरज नाही अशी खोचक टीका केली आहे.

योगी आदित्‍यनाथ यांच्यावर टीका करताना अखिलेश यादव यांनी कधी म्‍हणतात, अयोध्येतून लढणार, मथुरेतून लढणार, कधी प्रयागराज मधून लढणार… मात्र मला याचे बरे वाटले की, भाजपने योगींना गोरखपूरला पाठवले. आता योगींना तेथून येण्याची गरज नाही. त्‍यांनी तिथेच रहावे.

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी युती न केल्याच्या घोषणेवर अखिलेश म्हणाले, “ते काल माझ्याकडे आले होते. त्यांनी निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. मी लोकदलाशी बोललो आणि त्यांना गाझियाबाद आणि रामपूर मणिहरन जागा दिल्या. त्यानंतर फोनवर कोणाशी तरी बोलल्यानंतर ते आले आणि त्यांनी निवडणूक लढवू शकत नाही, असे सांगितले. कोणी बोलावले? कोणी रचला कट? माहित नाही.- म्हणूनच आम्ही म्हणतोय की आता आम्ही सपामध्ये कोणत्याही पक्षाचा आमदार किंवा नेता घेणार नाही. आता दुसऱ्याला घेण्याची शक्यता नाही. खूप त्याग करून आम्ही लोकांना एकत्र आणले आहे.”

कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याच्या आरोपांवर ते म्हणाले, “मी सर्वांना आवाहन करतो की प्रत्येकाने कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे. निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करा. मी सर्व कार्यकर्त्यांना तिकिटासाठी लखनौला येऊ नका, असे सांगत आहे. काल स्वामी प्रसाद मौर्य यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने सपा कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने कडक कारवाई केली आहे.

Back to top button