Swami Prasad Maurya : स्‍वामी प्रसाद मौर्य यांचा मंत्रीपदाचा राजीनामा, समाजवादी पार्टीत प्रवेश - पुढारी

Swami Prasad Maurya : स्‍वामी प्रसाद मौर्य यांचा मंत्रीपदाचा राजीनामा, समाजवादी पार्टीत प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला धक्‍का बसला आहे. भाजपचे श्रम मंत्री स्‍वामी प्रसाद मौर्य ( Swami Prasad Maurya )  यांनी राजीनामा दिला असून त्‍यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. भाजपचे आमदार रोशन लल, भगवती सागर आणि बृजेश प्रजापति यांनीही राजीनामा दिला असून. मौर्य यांचे समर्थक आमदार राजीनामा देवून समाजवादी पार्टीत प्रवेश करतील, असे मानले जात आहे.

राजीनामा दिल्‍यानंतर माध्‍यमांशी संवाद साधताना स्‍वामी प्रसाद मौर्य ( Swami Prasad Maurya )  यांनी सांगितले की, माझे व्‍यक्‍तिगत कोणीशीही शत्रुत्‍व नाही. सामाजिक न्‍यायासाठी मी सातत्‍याने संघर्ष केला आहे. यापुढेही करत राहणार आहे. सध्‍या तरी उत्तर प्रदेशमध्‍ये सामाजिक न्‍याय मिळताना दिसत नाही. त्‍यामुळेच मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

राजीनामा दिल्‍यानंतर मौर्य यांनी याची माहिती सोशल मीडियावरही दिली. त्‍यांनी फेसबुक पोस्‍टमध्‍ये नमूद केलं आहे की, उत्तर प्रदेशमधील दलित, मागास, शेतकरी, बेरोजगार तरुण आणि लघू व मध्‍यम उद्‍योजक उपेक्षित राहिले आहेत. त्‍यामुळे मी योगी मंत्रीमंडळातून राजीनामा देत आहे. आणखी १० ते १२ आमदार राजीनामा देतील. पुढील एक ते दोन दिवसांमध्‍ये पुढील रणनीती स्‍पष्‍ट करण्‍यात येईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

घाईगडबडीत घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात : उपमुख्‍यमंत्री केशव प्रसाद

स्‍वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्‍यानंतर उपमुख्‍यमंत्री केशव प्रसाद यांनी ट्‍विट केले आहे की, स्‍वामी प्रसाद मौर्य यांनी कोणत्‍या कारणास्‍तव राजीनामा दिला याची मला माहिती नाही. घाईगडबडीत घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात. त्‍यांनी आपल्‍या निर्णयाचा पुनर्विचार करावा.

मौय यांनी राजीनामा दिल्‍याने ममतेश शाक्‍य, विनय शाक्‍य, धर्मेद्र शाक्‍य आणि आमदार नीरज मौर्य हेही लवकर समाजवादी पार्टीत प्रवेश करतील, अशी चर्चा उत्तर प्रदेशच्‍या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्‍यान, अखिलेश यादव यांनी स्‍वामी प्रसाद मौर्य यांच्‍या समाजवादी पार्टीतील प्रवेशानंतर ट्‍विट केले आहे की, उत्तर प्रदेशमधील लोकप्रिय नेते स्‍वामी प्रसाद मौर्या व त्‍यांचे समर्थक नेते व कार्यकर्ते यांचे समाजवादी पार्टीत हार्दिक स्‍वागत आहे.

हेही वाचलं का?

 

 

 

Back to top button