Nashik Leopard : बिबट्याचा चक्क सोसायटीत मुक्काम
देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा, येथील आनंद रोड मार्गावरील नवजीवन सोसायटीलगत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने मुक्काम ठोकला असून, दिवसाढवळ्या तो अनेकांच्या नजरेस पडत आहे. याबाबत स्थानिक नागरिक सिद्धार्थ पगारे यांनी केलेल्या तक्रारीनंतर वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावला आहे. (Nashik Leopard News)
मागील आठवड्यात बिबट्याने रेस्ट कॅम्प रोडवरील चंद्रकांत कासार यांच्या बंगल्याच्या पडवीत कुत्र्याची शिकार केल्यानंतर सध्या बिबट्याचा मुक्काम आनंद रोड मार्गावरील नवजीवन सोसायटीलगत आहे. या सोसायटीजवळ विनी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी असून, शेजारी गोडसे यांची द्राक्षबाग आहे. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य नियमित आढळत आहे. त्यामुळे घराच्या मागील बाजूस जाणेदेखील धोकादायक झाले आहे. सोसायटीमध्ये लहान मुले खेळत असल्याने पालक वर्ग चिंतेत पडला आहे. वनविभागाने तातडीने या परिसरात येऊन पाहणी केली, यावेळी त्यांना बिबट्याच्या पावलाचे ठसे सोसायटी परिसरात आढळल्याने या ठिकाणी तातडीने पिंजरा लावला आहे.
हेेही वाचा :

