डॉ. बाबा आढाव यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार | पुढारी

डॉ. बाबा आढाव यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार

कुरूंदवाड, पुढारी वृत्तसेवा : येथील साधना मंडळ, राष्ट्र सेवा दलातर्फे देण्यात येणारा स्व. साथी सुरेंद्र आलासे समाजभूषण पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. बाबा आढाव यांना जाहीर झाला आहे. ही माहिती साधना मंडळाचे अध्यक्ष सदाशिव सुभेदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांच्या हस्ते व मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्या अध्यक्षतेखाली, तर दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साधना मंडळाच्या सभागृहात पुरस्कार वितरण होणार आहे.

डॉ. आढाव हे एक गाव एक पाणवठा, परित्यक्त्या स्त्रियांचे मुक्तिदाते, हमाल मापाड्यांचा कैवारी, मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी दुर्बल घटकांना हाक घालणारे समाजवादी, असंघटित मजुरांच्या पेन्शनसाठी दिल्लीला धडक देणारे, सत्यशोधकांचा इतिहास महाराष्ट्रापुढे जागता ठेवणारे समाजवादी नेते म्हणून त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Back to top button