Asian Games 2023 : नवव्‍या दिवशी भारताची सुरुवात आश्‍वासक, महिला आणि पुरूषांच्या स्पीड स्केटिंग रिलेत सांघिक कांस्य

Asian Games 2023 : नवव्‍या दिवशी भारताची सुरुवात आश्‍वासक, महिला आणि पुरूषांच्या स्पीड स्केटिंग रिलेत सांघिक कांस्य

पुढारी ऑनलाईन डेस्क :  आशियाई क्रीडा स्‍पर्धेत आठव्‍या दिवशी (दि.१) पदकांचा अर्धशतकांचा टप्‍पा भारताने दिमाखात पार केला. आज (दि.२ऑक्‍टाेबर) स्‍पर्धेच्‍या सुरुवात आश्‍वासक झाली आहे. संजना बथुला, कार्तिक जगदीश्‍वरन, हीरल साधू आणि आराथी कस्तुरी राज यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला रोलर स्केटिंग संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत ३००० मीटर स्पीड स्केटिंग रिलेमध्ये कांस्य पदक पटकावले आहे.

महिलांपाठोपाठ भारताच्या पुरुष स्पीड स्केटिंग संघानेही ३००० मीटर रिलेमध्ये कांस्यपदक मिळवले आहे. ९ व्या दिवशी भारताचे हे दुसरे पदक ठरले. भारताच्या आर्यनपाल घुमान, आनंदकुमार वेलकुमार, सिद्धांत कांबळे, विक्रम इंगळे यांनी ४:१०.१२८ वेळेसह तिसरे स्थान पटकावले आणि कांस्यपदक जिंकले. एकूण भारताच्या खात्यात आता ५५ पदके झाली असून हे २१वे कांस्यपदक आहे.

संबंधित बातम्या : 

भारतीय महिला रोलर स्केटिंग संघाने ही शर्यत ४ मिनिटे ३४.८६१ सेकंदात पूर्ण करून तिसरे स्थान पटकावले. चायनीज तैपेईने ४ मिनिटे आणि १९.४४७ सेकंदाच्या वेळेसह सुवर्णपदक जिंकले, तर दक्षिण कोरियाने ४ मिनिटे आणि २१.१४६ सेकंदाच्या वेळेसह रौप्यपदक जिंकले.

या कामगिरीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत रोलर स्केटिंगमधील भारताचे हे तिसरे पदक ठरले. यापूर्वी २०१० मध्ये ग्वांगझू येथे झालेल्या स्पर्धेत भारतीय रोलर स्केटर्सनी पुरुषांच्या जोडी स्केटिंग स्पर्धेत दोन कांस्य पदके जिंकली होती.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news