नाशिक : शिक्षण,आरोग्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : सुंदर गाव पुरस्काराचे वितरण करताना पालकमंत्री दादा भुसे. समवेत नरहरी झिरवाळ आदी.
नाशिक : सुंदर गाव पुरस्काराचे वितरण करताना पालकमंत्री दादा भुसे. समवेत नरहरी झिरवाळ आदी.
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भावी पिढी उभी राहण्यासाठी शिक्षण, आरोग्य यांमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. या नावीन्यपूर्ण उपक्रमांना निधीची कमतरता पडणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. जिल्ह्यातील काही गावांमध्ये लोकसहभागातून महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले जात आहे. हे उपक्रम सर्वांनी आपल्या गावांमध्ये राबविले तर सर्व गावे आदर्श गावे म्हणून ओळखली जातील, असेही ना. भुसे यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत 'मिशन 100 आदर्श शाळा विकसित करणे' कार्यशाळा शुक्रवारी (दि. 17) गंगापूर रोडवरील राबसाहेब थोरात सभागृहात झाली. कार्यशाळेचे उद्घाटन ना. भुसे यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, बाळासाहेबांच्या शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, युवानेते उदय सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आदी उपस्थित होते. यावेळी ना. भुसे म्हणाले की, या 100 शाळांचे रूपांतर एक हजार शाळांमध्ये करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महिला बचतगटांच्या उत्पादनास चांगला भाव व विक्रीसाठी शासकीय जागा उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत जिल्हा परिषदेने तयार केलेले हेल्थ कार्ड अतिशय महत्त्वाचे आहे. नाशिकची ही योजना नक्कीच इतर जिल्हे घेतील. आमदार झिरवाळ यांनी, गावांनी योजनांवर अवलंबून न राहता लोकसहभाग वाढवून नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याची गरज व्यक्त केली. आमदार खोसकर यांनीही मार्गदर्शन केले. आशिमा मित्तल यांनी आदर्श शाळा विकसित करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विस्तार अधिकारी नीलेश पाटोळे यांनी प्रास्ताविक तर शिक्षण विस्तार अधिकारी नेहा शिरोरे यांनी सूत्रसंचालन केले. उपशिक्षणाधिकारी धनंजय कोळी यांनी आभार मानले. कार्यशाळेपूर्वी मान्यवरांच्या हस्ते राज्य शासनाचा 'स्व. आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार' निफाड तालुक्यातील थेरगाव आणि इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे या गावांना विभागून देण्यात आला. तसेच 15 तालुक्यांतील 15 गावांना तालुका स्तरावरील सुंदर गाव पुरस्काराचे वितरण झाले. उमेद अंतर्गत महिला बचतगटांना देणार्‍या निधीच्या धनादेशाचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरणही यावेळी झाले.

या गावांचा झाला सन्मान…
वडांगळी (सिन्नर), वेळुंजे (त्र्यंबकेश्वर), शिरसाठे (इगतपुरी), थेरगाव (निफाड), सुळे (कळवण), बोराळे (नांदगाव), राजदेरवाडी (चांदवड), दरी (नाशिक), भारदेनगर (मालेगाव), कोपुर्ली बु. (पेठ), महालखेडा पा. (येवला), पिंपळदर (बागलाण), करंजवण (दिंडोरी), वरवंडी (देवळा) आणि बुबळी (सुरगाणा). तर, श्रीकृष्ण महिला बचतगट (करंजवण, ता. पेठ), ओमसाई महिला सहाय्यता समूह आणि सुकन्या महिला बचतगट यांनी यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वितरण करण्यात आले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news