Nashik 12th Exam : इंग्रजीच्या पेपरला ‘इतक्या’ विद्यार्थ्यांची दांडी

Nashik 12th Exam : इंग्रजीच्या पेपरला ‘इतक्या’ विद्यार्थ्यांची दांडी
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला मंगळवार (दि.२१)पासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला नाशिक विभागातून तब्बल ३ हजार ४८६ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. त्यात नाशिक जिल्ह्यातील एक हजार १४८, धुळे जिल्ह्यातील ७६०, नंदुरबार जिल्ह्यातील ५३३, तर जळगाव जिल्ह्यातील १ हजार ४५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेसाठी नाशिक विभागातील २५६ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी नाशिक विभागातून १ लाख ६१ हजार ८०४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ५८ हजार ७३२ विद्यार्थ्यांनी पेपर दिला. तर ३ हजार ४८६ विद्यार्थी गैरहजर होते. ४०८ विद्यार्थी ऐनवेळी प्रविष्ट झाले होते. नाशिकमध्ये ७४ हजार २७६ पैकी ७३ हजार ३२३, धुळेमध्ये २३ हजार ८२१ पैकी २३ हजार १०५, जळगावमध्ये ४६ हजार ९८९ पैकी ४६ हजार १२२, तर नंदुरबारमध्ये १६ हजार ७०८ पैकी १६ हजार १८२ विद्यार्थी हजर हाेते.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील १ हजार १४८, धुळे जिल्ह्यातील ७६०, जळगाव जिल्ह्यातील १ हजार ४५, तर नंदुरबार जिल्ह्यातील ५३३ विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाच्या पेपरकडे पाठ फिरविली होती. नाशिकमधून १८९, धुळेमधून ३४, जळगावमधून १७८, तर नंदुरबारमधून ७ विद्यार्थी ऐनवेळी प्रविष्ट झाले हाेते.

विभागात दोन कॉपीबहाद्दर

नाशिक विभागात दोन कॉपीबहाद्दरांना भरारीपथकाने पकडले आहे. सकाळी ११ ते २ यावेळेत परीक्षा पार असताना धुळे जिल्ह्यात भरारीपथकाने कारवाई करत दोन कॉपी प्रकरणे उजेडात आणली. नाशिक, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात काॅपी प्रकरण निरंक होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news