Air India : एअर इंडियाच्या विमानाचे स्वीडनमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय झालं पाहा | पुढारी

Air India : एअर इंडियाच्या विमानाचे स्वीडनमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय झालं पाहा

पुढारी ऑनलाईन : एअर इंडियाच्या नेवार्क (अमेरिका) ते दिल्ली (AI106) विमानाचे स्वीडनच्या स्टॉकहोम विमानतळावर बुधवारी (दि.२२) इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. सुमारे 300 प्रवाशांना घेऊन निघालेल्या विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक अडथळा निर्माण झाल्याने आपत्कालीन लँडिंग करण्यात, मात्र सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

विमानातील तेल गळतीमुळे ही कारवाई करण्यात आली. तेलगळतीची समस्या लक्षात येताच, इंजिन बंद करण्यात आले आणि नंतर फ्लाइट स्टॉकहोममध्ये सुरक्षितपणे उतरवण्यात आल्याचे येथील विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. विमानाने आपत्कालीन लँडिंग केल्यानंतर मोठ्या संख्येने अग्निशमन दल विमानतळावर तैनात होते, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

तपासणीदरम्यान एअर इंडियाच्या दोनच्या ड्रेन मास्टमधून तेल बाहेर पडताना दिसले, यामध्ये सध्या दुरूस्तीचे काम सुरू आहे.

याआधी सोमवारी (दि.२०), वैद्यकीय आणीबाणीमुळे न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान लंडनला वळवण्यात आले होते. यानंतर हिथ्रो येथील आमच्या ग्राउंड स्टाफला सतर्क करण्यात आले आणि संबंधित व्यक्तीला रुग्णालयात हलवण्याची तयारी करण्यात आली अशी माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने एएनआय या वृत्तसंस्थेला दिली होती.

Back to top button