

पुढारी ऑनलाईन डेस्क : रॉकस्टार आणि मैं तेरा हिरो सारख्या आपल्या चित्रपटांनी मन जिंकणारी सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री नर्गिस फाखरी ही तलुबाज या वेब सिरीजद्वारे तिचे ओटीटी पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. (Nargis Fakhri)
नर्गिस तिच्या नवीन अवतारात अफलातून दिसत आहे. इसाबेलच्या रूपात ती दिसणार आहे. तिच्या अप्रतिम लूकमुळे नर्गिसच्या चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. तिच्या अभिनयाची जादू पाहण्यासाठी चाहते ऑन-स्क्रीन नर्गिसची प्रतीक्षा करत आहेत. (Nargis Fakhri)
या सीरिजच्या शूटिंगसाठी नर्गिस वाराणसी शहरात पोहोचली. तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे नर्गिस सेटवरच्या तिच्या प्रवासाची पडद्यामागील झलक शेयर केली आहे. नर्गिसच्या ओटीटी पदार्पणासाठी सगळेच उत्सुक आहेत.