‘तिरसाट’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

tirsat movie
tirsat movie
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'तिरसाट' हा प्रेमाचा नवा हळवा प्रवास आहे, तिरसाटच्या निमित्ताने सुरु झालेला प्रेम मिळवण्यासाठीचा हा प्रवास दिग्दर्शक प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी या चित्रपटात मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला असून 'नीरज सूर्यकांत' आणि 'तेजस्विनी शिर्के' ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. या चित्रपटामधील पी. शंकरन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आणि पार्श्वसंगीत या चित्रपटाचा जीव असून हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार आहे. दिनेश किरवे यांच्या 'क्लास वन फिल्म्स'ने 'तिरसाट' या चित्रपटाची निर्मिती केलीय. अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे 'अल्ट्रा झकास' या मराठी ओटीटीवर पहिल्यांदाच वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.

बाळ्याचं खरं प्रेम समीने नाकारल्यानंतर, 'समीशिवाय आपले जीवन नाही' असे वाटल्याने बाळू आपले जीवन संपवण्याचे पाऊल उचलतो. परंतु बाळूचे वडील हे कृत्य थांबवण्यासाठी धावतात आणि त्याला जीवन आणि प्रेमाचे सार समजावून सांगतात. जीवनात एक यशस्वी व्यक्ती बनण्यासाठी आणि प्रेम मिळवण्यासाठी तो एक उद्योजक बनतो आणि स्वतःला सिद्ध करून आपल्या आयुष्याला एक नवे वळण देतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news