Kantara 2: पंजुरलीची कहाणी येणार उजेडात, यादिवशी रिलीज होणार कंतारा 2 | पुढारी

Kantara 2: पंजुरलीची कहाणी येणार उजेडात, यादिवशी रिलीज होणार कंतारा 2

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऋषभ शेट्टीचा चित्रपट ‘कंतारा’ने मागील वर्षी धुमाकूळ घातला होता. आता प्रेक्षकांना चित्रपटाच्या सीक्वेलची प्रतीक्षा आहे. आता चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी सीक्वलची तयारी पूर्ण केली आहे. (Kantara 2) लवकरच या चित्रपटावर काम केले जाईल. साऊथ चित्रपट कंताराच्या कहाणीने प्रेक्षकाच्या मनात घर केले. त्यानंतर प्रेक्षक आता दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहे. होम्बले फिल्म्स अंतर्गत ऋषभ शेट्टीद्वारा लिखित आणि दिग्दर्शित आणि विजय किरागांदुरद्वारा निर्मित ॲक्शन-थ्रिलर चित्रपटामध्ये शेट्टीने एक कंबाला चॅम्पियनची भूमिका साकारली, जो एक प्रामाणिक डीआरएफओ अधिकारी, मुरलीसोबत भांडण करतो. चर्चा आहे की ऋषभ शेट्टी नोव्हेंबर २०२३ पासून कंतारा सीक्वलचे शूटिंग सुरू करत आहेत. (Kantara 2)

नोव्हेंबरपासून शूटिंगचा पहिला टप्पा सुरु होणार

माहितीनुसार, निर्मात्यांनी शूटिंगची वेळ ठरवली आहे. १ नोव्हेंबर शूटिंगचा पहिला टप्पा सुरू होईल. ऋषभ शेट्टी आणि त्यांच्या टीमने चित्रपटाच्या कहाणीचे काम पूर्ण केले आहे. सध्या ते प्री-प्रोडक्शनमध्ये बिझी आहेत. पहिला भाग शेट्टीचे गाव असलेले कंडापुरामध्ये शूट केले. कंतारा २ मंगळुरूमध्ये शूट केले जाईल. स्क्रिप्टनुसार जंगल आणि पाणी यासारख्या लोकेशन ठिकाणी शूटिंग केले जाणार असल्याची माहिती समोर आलीय. चित्रपटाचे बजेट आणि कलाकाराची टीम देखील वाढलीय. या चार महिन्याच्या शेड्यूलमध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रपटाचे शूटिंग होईल.

Back to top button