

[web_stories title="false" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]
इंफाळ; पुढारी ऑनलाईन : राजस्थानची नंदिनी गुप्ता ही फेमिना मिस इंडिया २०२३ विजेती ठरली आहे. नंदिनीसह दिल्लीच्या श्रेया पुंजा पहिली उपविजेता (first runner up) तर मणिपूरच्या थौनाओजम स्ट्रेला लुवांग हिला दुसरी उपविजेता (second runner up) ठरविण्यात आले. ३० राज्यातील विजेत्यापैकी पहिल्या तिघींची निवड करण्यात आली. या तिघींमधून नंदिनी गुप्ता मिस इंडियाची विजेती ठरली. फेमिना मिस इंडियाचा ग्रँड फिनाले सोहळा शनिवारी (दि.15) मध्यरात्री मनीपूरची राजधानी इंफाळ येथे पार पडला. (Miss India 2023)
माजी फेमिना मिस इंडिया २०२२ कर्नाटकची सिनी शेट्टी हिने नंदिनीच्या डोक्यावर मिस इंडियाचा मुकूट घालून नंदिनीला अधिकृत मिस इंडिया २०२२ चा किताब बहाल करण्यात आला. तर राजस्थानची माजी पहिली उपविजेता रुबल शेखावत आणि उत्तर प्रदेशची माजी २ री उपविजेता शिनात चौहान यांनी अनुक्रमे श्रेया आणि थौनौजम यांना मुकुट घातला. फेमिना मिस इंडिया २०२३ बनल्या नंतर नंदिनी गुप्ता आता ती अधिकृतपणे मिस वर्ल्ड २०२४ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. (Miss India 2023)
[web_stories title="true" excerpt="true" author="true" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="ASC" orderby="post_date" view="list" /]
१९ वर्षांची नंदिनी गुप्ता ही मुळची राजस्थान येथील कोटा शहरातील रहिवासी आहे. व्यवसाय व्यवस्थापनात पदवी घेण्यासाठी प्रेरीत असून तीच्या मते लहान वयात आलेलं अपयश ही स्वत:ची ओळख निर्माण करण्याचे काम करु शकते. अशी लहान लहान अपयश पचवूनच पुढे जाणे हे प्रेरणादायी असते.
फेमिना मिस इंडिया 2023 चा ग्रँड फिनाले हा शो मणिपूरच्या इम्फाळ शहरातील खुमान लम्पक स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास बॉलिवूडचे स्टार अनन्या पांडे, कार्तिक आर्यन, नेहा धुपिया, भूमी पेडणेकर आणि मनीष पॉल यांच्यासह अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी उपस्थित राहून या कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर लक्ष वेधले होते
अधिक वाचा :