

पुढारी ऑनलआईन : मीरा भाईंदरमधील सरस्वती वैद्यच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपी मनोज साने याला आज ठाणे न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत २२ जूनपर्यंत वाढ केली आहे. ((Mira Road Murder)
मीरा भाईंदर येथील सरस्वती वैद्य हत्या प्रकरणात रोज अनेक खुलासे होत आहेत. या प्रकरणात मनोज साने याने लिव्ह-इन पार्टनर सरस्वती वैद्य हिची हत्या केली. तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवले असल्याची कृर घटना घडली होती. या ३६ वर्षीय महिलेच्या मृतदेहाचे ३५ तुकडे सापडले असल्याची माहिती यापूर्वी पोलिसांनी दिली होती. या तुकड्यांचा डीएनए सरस्वती वैद्य यांच्या बहिणींशीही जुळला आहे. पोलिसांना सापडलेले काही तुकडेही प्रेशर कुकरमध्ये (Mira Road Murder) शिजवलेले होते.
मनोज पोलिसांना वेगवेगळी माहिती सांगत आहे. दोघांचे भांडण होत होते. या भांडणातून शनिवारी मध्यरात्री त्याने सरस्वतीची हत्या (Mira Road Murder) केली. यानंतर तो 29 मे पासून कामाला गेला नव्हता. प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे अनेक तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणार्या आरोपी मनोज साने याने मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याची माहिती गुगल सर्च केले होते.
हत्या केल्यानंतर त्याने डू नॉट डिस्ट्रब नावाची वेब सीरिज बघितली होती. त्यानंतर श्रद्धा वालकर प्रकरण त्याने पाहिले होते तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आफताब याने जसा प्रयत्न केला तसाच प्रयत्न मनोजनेही केला असल्याचे पुढे येत आहे. पोलिस तपासात तिने आत्महत्या केली आहे असे देखील तो बोलत आहे. त्यामुळे खरे कारण शोधण्याचा पोलिस तपास करत आहे.