Mira Road Murder : मृतदेह विल्हेवाटीसाठी गुगल सर्च; हत्येनंतर वेबसीरिजही पाहिली | पुढारी

Mira Road Murder : मृतदेह विल्हेवाटीसाठी गुगल सर्च; हत्येनंतर वेबसीरिजही पाहिली

मीरा रोड; पुढारी वृत्तसेवा : प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे अनेक तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपी मनोज साने याने मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याची माहिती गुगल सर्च केले होते. मीरा रोड येथे दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता.

मनोज पोलिसांना वेगवेगळी माहिती सांगत आहे. दोघांचे भांडण होत होते. या भांडणातून शनिवारी मध्यरात्री त्याने सरस्वतीची हत्या केली आहे. 29 मे पासून तो कामाला गेला नव्हता. हत्या केल्यानंतर त्याने डू नॉट डिस्ट्रब नावाची वेब सीरिज बघितली होती. त्यानंतर श्रद्धा वालकर प्रकरण त्याने पाहिले होते तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आफताब याने जसा प्रयत्न केला तसाच प्रयत्न मनोजनेही केला असल्याचे पुढे येत आहे. पोलिस तपासात तिने आत्महत्या केली आहे असे तो बोलत आहे. त्याचे खरे कारण शोधण्याचा पोलिस तपास सुरू आहे. आरोपीने महिलेसोबत मंदिरात लग्नगाठ बांधली होती. परंतु दोघांच्या वयात 22 वर्षांचा फरक असल्याने बाहेर लोकांना सांगण्यासाठी त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपचा आधार घेतला होता. तसेच पोलिसांना सुरुवातीला त्याला व त्याच्या प्रेयसीला कोणीही नातेवाईक नसल्याचे सांगितले होते. परंतु हत्येची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी मृत महिलेच्या तीन बहिणी नयानगर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्या महिलेला तसेच त्याला देखील नातेवाईक असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.

Back to top button