

म्हाडातील गट 'अ', 'ब' व 'क' मधील १४ संवर्गातील ५६५ रिक्त पदे भरण्याकरिता राबविण्यात आलेल्या सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत
( MHADA Recruitment ) आयोजित स्पर्धात्मक परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठीची मुदत वाढवण्यात आली आहे. २१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
( MHADA Recruitment ) परीक्षा शुल्क भरण्याची मुदतही २२ ऑक्टोबर रात्री २३.५९ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी दिली. म्हाडा प्रशासनातर्फे सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी १७ सप्टेंबरपासून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
ही पदभरती प्रक्रिया विविध संवर्गातील एकूण ५६५ रिक्त पदांसाठी राबविण्यात येत आहे. त्यामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य) १३ पदे, उप अभियंता (स्थापत्य) १३ पदे, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी २ पदे, सहायक अभियंता (स्थापत्य) ३० पदे, सहाय्यक विधी सल्लागार २ पदे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ११९ पदे, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक ६ पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ४४ पदे, सहायक १८ पदे, वरिष्ठ लिपिक ७३ पदे, कनिष्ठ लिपिक टंकलेखक २०७ पदे, लघुटंकलेखक २० पदे, भूमापक ११ पदे,तर अनुरेखकाच्या ७ पदांचा समावेश आहे.