Paris Fashion Week मध्ये मासूमचा जलवा; दिलकश अदांनी चाहते घायाळ

Paris Fashion Week मध्ये मासूमचा जलवा; दिलकश अदांनी चाहते घायाळ
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने Paris Fashion Week मध्ये रॅम्‍पवर चांगलीच जादू पसरवली होती. तर दुसरीकडे डिजिटल कंटेट क्रिएटर मासूम मिनावाला मेहता (Masoom Minawala Mehta) ही काही कमी नाही. जगातील सर्वात लोकप्रिय फॅशन वीक Paris Fashion Week 2021 मधील एक असलेल्‍या पॅरिस फॅशन वीकमध्ये मासूमने आपल्‍या फॅशनने लोकांना वेड लावले. या फॅशन वीकच्या निमित्ताने अनेक तरुण आणि सुंदर उद्योजकांनीही या ठिकाणी सहभाग घेतला आहे. त्यापैकी एक मासूम मीनावाला देखील आहे.

मासूमचा पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभाग

मासूमने नुकतीच पॅरिस फॅशन वीकमधील सहभागाची काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. त्‍या फोटोंना चाहत्‍यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

मासूम या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. मासूमने या 2021 फॅशन वीक दरम्यान एक मुलाखतही दिली आहे. ज्यात तिने सांगितले की, पॅरिस फॅशन वीकमध्ये असणे हा एक आश्चर्यकारक अनुभव आहे.

फॅशन हाऊस, ब्रँड आणि डिझायनर ड्रेस परिधान करणे मोठी संधी

विविध फॅशन हाऊस, ब्रँड आणि डिझायनर यांचे नवीन ड्रेस परिधान करणे ही एक मोठी संधी असल्‍याच तीन म्‍हटलं आहे. फॅशन जगात पुढे काय येत आहे. याची एक झलक या ठिकाणी पाहायला मिळाली. भारतीय प्रेक्षकांना जागतिक ट्रेंडबद्दल माहिती देणे आणि त्यांच्यासाठी माध्यम बनणे खूप छान वाटते. तसेच आपल्‍या लुक्‍स सोबत नवनवीन प्रयोग करणे हा देखील एक वेगळा अनुभव असल्‍याच तीने म्‍हटलं आहे.

मासूमने अलीकडेच 2021 पॅरिस फॅशन वीकमध्ये हर्म्स शो (Hermes show) मध्ये भाग घेतला. या ठिकाणी दिलेल्‍या मुलाखतीत तिने आपल्‍यासाठी हा एक आश्चर्यकारक अनुभव असल्‍याचे म्‍हटले होते.

मासूमचा या पॅरिस फॅशन वीकमधील अंदाज तिच्या चाहत्‍यांना चांगलाच भावला.

मासुमने तिच्या इंस्‍टाग्रामवर शेअर केलेल्‍या फोटो आणि व्हिडिओंवर तिचे चाहते धडाधड लाइक्‍स आणि कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पाडत आहेत.

कान्स चित्रपट महोत्सवातही हजेरी

मासूमने अशा कार्यक्रमाला हजेरी लावण्याची ही पहिलीच वेळ नाही, तर त्याआधी तिने कान्स चित्रपट महोत्सवातही हजेरी लावली आहे.

त्‍या ठिकाणी तीने रेड कार्पेटवर सहभाग घेतला होता.

मिनावाला मेहताने कान्स फेस्‍टिवलमध्ये भारतीय पोशाख आणि भारतीय डिझायनर्सना प्रमोट केले होते.

त्या काळात ती प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांच्या पांढऱ्या शिमरी साडीमध्ये दिसली होती.

ज्यासोबत तिने मॅचिंग ब्लाउज घातला होता. यासोबत तिने खूप सुंदर डिझाईन केलेले दागिनेही परिधान केले होते.

तिने झुमके, अंगठ्या आणि कमीत कमी मेकअपसह तिचा लुक पूर्ण केला होता.

इन्स्टाग्रामवर एक सौंदर्य आणि फॅशन ब्लॉगर

मीनावाला इन्स्टाग्रामवर एक सौंदर्य आणि फॅशन ब्लॉगर आहे.

यापूर्वी, ती 2019 मध्ये कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय फॅशन इन्फ्लुएंसर (Fashion Influencer) आहे.

ती अनेक मोठ्या ब्रँडची राजदूतही राहिली आहे.

यासोबत ती फॅशन व्हिडिओ बनवून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक बजेटमध्ये चांगल्या ब्रँडची माहिती देत असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news