

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री मंदिरा बेदीने क्रिकेट खेळाडूंबद्दलच्या आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका वेबसाईडला दिलेल्या मुलाखतीत, "जेव्हा मी क्रिकेटपट्टूंच्या मुलाखती घ्यायचे तेव्हा माझ्याकडे ते एकटक बघायचे, जणू काही मी त्यांना हे प्रश्न का विचारते" असे तिने सांगितले आहे.
मुलाखतीमध्ये ती म्हणते की, सुरूवातीला मी जेव्हा या क्षेत्रात प्रवेश केला, मला कोणी स्विकारले नाही. चर्चेसाठी माझ्या गटात कोणीही सहभागी होत नव्हते. आज कित्येक क्रिकेटपट्टू माझे मित्र आहेत, पण तेव्हा एक महिला साडी घालून क्रिकेटविषयी बोलते हे अनेक खेळाडूंना खटकत होते. यामध्येही कोणी मला काहीही प्रश्न विचारले नाहीत. त्यावेळी मी याच क्रिकेटबद्दलच्या तांत्रिक गोष्टी ज्या लोकांना माहीत नाहीत, त्या सांगण्याचा प्रयत्न करत होते. तरीही मला कोणी मदत केली नाही.
मंदिरा पुढे म्हणाली, मला चॅनेलने हे स्वातंत्र्य दिले होते की, माझ्या डोक्यात जो प्रश्न येईल, तो मी विचारू शकते. जेव्हा मी प्रश्न विचारायचे, त्यावेळी मला अनेक खेळाडू रागाने एकटक बघायचे. जसे काही मी त्यांना काय आणि का हा प्रश्न विचारते. अनेकजणांनी मला प्रश्नांची उत्तरं देणंही टाळले. परंतु चॅनेलने मला १५० ते २०० महिलांमध्ये या कामासाठी निवडले होते. त्यांनी मला सांगितले होते, त्यांनी मला यासाठी निवडले आहे की, मी या ठिकाणी सर्व प्रसंगाचा सामना शकते. तसेच हे काम आनंदांने करून पुढे जाऊ शकते.
चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच बॉलीवूड अभिनेत्री मंदिरा बेदीने क्रिकेट होस्टिंगचे कामही केले आहे. त्यांनी क्रिकेट होस्ट म्हणूनही चांगलीच पसंती मिळाली होती. मंदिरा या पहिल्या महिला अँकर आहेत, ज्यांनी २००३ आणि २००७ मध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत होस्टींग आणि कॉमेंट्री केली होती. याशिवाय, तिने २००४ आणि ०६ मध्ये आपीएलच्या दोन सत्रांमध्येही होस्टींग केले होते.