rain : राज्यात पुढच्या २४ तासांत जोरदार पावसाची शक्यता | पुढारी

rain : राज्यात पुढच्या २४ तासांत जोरदार पावसाची शक्यता

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील राज्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यावरही झाला असून, सोमवार (7 मार्च) पासून काही भागांत हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. (rain)

दरम्यान, राज्यात अनेक भागांत सध्या दुपारनंतर ढगाळ वातावरण राहात असल्याने दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. कमी दाबाचे क्षेत्र उत्तर-पूर्व दिशेने पुढे सरकत आहे. त्यामुळे तमिळनाडू, आंध— प्रदेश आणि जवळच्या राज्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्राच्या दिशेनेही बाष्प येत आहे. ७ मार्चपासून काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ७ मार्चपासून पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

rain : या जिल्ह्यात पावसाची शक्यता

पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगाव आदी जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटात आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Back to top button