

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाने उघड्यावर लघुशंका केल्याची घटना समोर आली आहे. इतर प्रवाशांच्या तक्रारीवरून संशयितावर गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना ८ जानेवारीला सायंकाळी घडली. जोहर अली खान (वय ३९) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तो बिहारचा रहिवासी आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एक्झिट गेट क्रमांक ६ जवळ एक व्यक्ती उघड्यावर लघुशंका करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. माहिती मिळताच दिल्ली पोलीस आणि सीआयएसएफची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी जोहर अली खान याला पकडले. तो दिल्लीहून सौदी अरेबियातील दम्मामला जाण्यासाठी विमानतळावर आला होता. जोहर विमानतळावर उघड्यावर लघुशंका करत असताना तेथून जाणाऱ्या प्रवाशांनी त्याला विरोध केला.त्याने सर्वांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला अटक केली.
हेही वाचा :