World Bank forecasts : विकसनशील देशांना २०२३ मध्ये बसणार मंदीचा फटका, जागतिक बँकेचा इशारा | पुढारी

World Bank forecasts : विकसनशील देशांना २०२३ मध्ये बसणार मंदीचा फटका, जागतिक बँकेचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक बँकेने मंगळवारी दिलेल्या एका अहवालातून २०२३ मध्ये विकसनशील देशांना मंदीचा फटका बसू शकतो असा इशारा दिला आहे. जागतिक बँकेने म्हटले आहे की तीक्ष्ण, दीर्घकाळ चालू मंदीचा विकसनशील देशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था फक्त १.७ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केली आहे.⁠ (World Bank forecasts)

जागतिक बँकेकडून सोमवारी (दि.१०) ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स अहवाल जाहीर करण्यात आला. गेल्या सहा महिन्यांपूर्वी जे अंदाज वर्तवण्यात आले होते त्यापेक्षा हे प्रमाण निम्मे आहे. त्यामुळे विकसनशील देशांवरी मंदीचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता जागतिक बँकेने वर्तवली आहे.

अहवालानुसार, चीन वगळता उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमधील वाढ 2022 मध्ये ३.८ टक्क्यांवरून 2023 मध्ये १.७ टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. या अहवालात भारदस्त चलनवाढ, उच्च व्याजदर, कमी झालेली गुंतवणूक आणि रशियाच्या युक्रेनवरील आक्रमण यांसारख्या निर्माण झालेल्या व्यत्ययांमुळे जागतिक आर्थिक वाढ झपाट्याने कमी होत असल्याचे बँकेने म्हटले आहे. एकाच दशकात दोनवेळा जागतिक मंदी आल्याची ८० वर्षांहून अधिक काळातील ही पहिलीच वेळ असेल, असे संस्थेने म्हटले आहे

जागतिक स्तरावरील ही नाजूक आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, कोणताही नवीन प्रतिकूल विकास, अपेक्षेपेक्षा जास्त महागाई, व्याजदरात अचानक झालेली वाढ, कोविड-19 या साथीच्या रोगाचे पुनरुत्थान किंवा वाढणारा भू-राजकीय तणाव हे जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीच्या दिशेने ढकलू शकते. असे मत जागतिक बँकेने आपल्या सध्याच्या ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स अहवालात म्हटले आहे.

अहवालानुसार, जागतिक अर्थव्यवस्था 2023 मध्ये १.७ टक्के आणि 2024 मध्ये २.७ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. जागतिक बँक समुहाचे अध्यक्ष डेव्हिड मालपास म्हणाले की, विकासासमोरील संकट तीव्र होत आहे आणि ते उदयास येत आहे. जगभरातील विकसनशील देशांवरील कर्जाचा बोजा वाढत आहे. या देशांमधील गुंतवणुक कमकुवत झाली आहे. त्यामुळे हे देश संथ आर्थिक वाढीचा सामना करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (World Bank forecasts)

हेही वाचा:

 

Back to top button