प्रचंड धुक्यामुळे रेल्वेकडून तीनशेपेक्षा जास्त गाड्या रद्द | पुढारी

प्रचंड धुक्यामुळे रेल्वेकडून तीनशेपेक्षा जास्त गाड्या रद्द

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : उत्तर आणि पूर्व भारतात थंडी आणि धुक्याचा कहर कायम असून या कारणामुळे बुधवारी (दि. ११) रेल्वेला तीनशेपेक्षा जास्त गाड्या रद्द कराव्या लागल्या. याशिवाय असंख्य गाड्या उशीराने धावत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अनेक ठिकाणी दृश्यता पन्नास मीटरपेक्षा कमी झाल्याने त्याचा परिणाम रेल्वे, रस्ते तसेच हवाई वाहतुकीवर झालेला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार धुक्याची एक मोठी चादर पंजाबपासून ते उत्तर पश्चिम राजस्थान, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश ते बिहारपर्यंत पसरलेली आहे. राजधानी दिल्लीतही धुक्यामुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वेने बुधवारी १३१ गाड्या पूर्णपणे रद्द केल्या. तर उर्वरित गाड्या निर्धारित स्थानकापूर्वी थांबविण्यात आल्या. काही गाड्या चौदा ते पंधरा तास उशीराने धावत होत्या. पुढील २ ते ३ दिवस जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर मध्य प्रदेश, बिहार, प. बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा याठिकाणी दाट धुके राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

 

हेही वाचलंत का ? 

Back to top button