Viral Video: सोबत कुणीच नव्हतं, पण श्रद्धा होती; स्वतः घडवलेल्या बाप्पाला दिला भावनिक निरोप, भक्ताचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Ganpati Visarjan Video: एक व्यक्ती स्वतःच्या हाताने घडवलेली गणेशमूर्ती घेऊन एकटाच विसर्जनासाठी आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Ganpati Visarjan Video
Viral Ganpati Visarjan VideoPudhari
Published on: 
Updated on: 

Viral Ganpati Visarjan Video: गणेशोत्सवाच्या उत्साहात अनेक ठिकाणी ढोल-ताशांचा गजर, मोठी मिरवणूक आणि भक्तांची गर्दी पाहायला मिळते. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ या सगळ्यापेक्षा वेगळा आहे, तसेच भावनिक क्षणामुळे हा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्वतःच्या हाताने घडवलेली गणेशमूर्ती घेऊन विसर्जनासाठी येताना दिसत आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या सोबत कुणीही दिसत नाही. एकट्याने बाप्पाची मूर्ती घेऊन आलेल्या या भक्ताचा बाप्पाला निरोप देतानाचा क्षण अनेकांच्या मनाला स्पर्शून गेला आहे.

ही पोस्ट ‘Poster Boy Chetan’ या Instagram अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये या व्यक्तीची पार्श्वभूमी किंवा त्यांच्यासोबत कोणी का नव्हते, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, स्वतःच्या हाताने बाप्पाची मूर्ती तयार करून त्याच श्रद्धेने विसर्जनासाठी आलेल्या या भक्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

Viral Ganpati Visarjan Video
Vidyanand Bapat: गणेशोत्सवानंतर काय करणार? विद्यानंद बापटांनी सांगितला पुढचा प्लॅन, राजकारणाच्या चर्चांना दिला पूर्णविराम

पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे की, “काल स्वतःच्या डोळ्यांनी एक असा क्षण अनुभवला, जो कदाचित आयुष्यभर मनात राहील…” पुढे या व्यक्तीच्या चेहऱ्यावर बाप्पाला निरोप देताना दिसणारी श्रद्धा आणि भक्ती पाहून मन हेलावून गेल्याचे म्हटले आहे.

या व्हिडिओनंतर सोशल मीडिया युजर्सनीही भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, “बाप्पा...... या काका साठी कधीच काही कमी पडू देऊ नकोस”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Viral Ganpati Visarjan Video
Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची नेमबाजीत कमाल! रौप्यपदकासह तिलोत्तमा-विदार्साची फायनलमध्ये धडक

तर दुसऱ्या युजरने लिहिले, “सोबत कोण नव्हतं? अरे साक्षात बाप्पा त्याच्या सोबत आहे… अजून कश्याला कोण पाहिजे?” या प्रतिक्रियेलाही अनेकांनी पसंती दिली आहे.

एका युजरने “कुणी साथ दिली नाही तरी बाप्पा साथ देतील”, असे म्हणत या भक्ताच्या भावनेला सलाम केला आहे.

बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठी गर्दी किंवा भव्य मिरवणूक असण्याची गरज नाही. श्रद्धा आणि भक्ती मनापासून असेल, तर एक भक्तही बाप्पाला तितक्याच भावनेने निरोप देऊ शकतो.

या भावनिक क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून या भक्ताच्या श्रद्धेला सलाम केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news