

वाशीम.; पुढारी वृत्तसेवा : अमरावती शिक्षक विभागाचे अपक्ष आमदार अॅड. किरण सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि.४) वाशीम येथे (शिंदे गट )शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे वाशीम-यवतमाळ लोकसभा उमेदवारीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे.
वाशीम येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळाचा लोकार्पण सोहळा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या दरम्यान महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपक्ष आमदार अॅड. किरणराव सरनाईक शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. गेल्या २५ वर्षापासून वाशीम-यवतमाळ लोकसभेला बालेकिल्ला समजणाऱ्या विद्यमान खासदारांच्या तिकिटाला हेलकावणी मिळण्याची शक्यता आहे. शिक्षक विभागातून सर्वाधिक मताने निवडून आलेले आमदार अॅड. किरणराव सरनाईक यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाने लोकसभा निवडणुकीचे चित्र पलटण्याची शक्यता आहे. आमदार सरनाईक हेच रणांगणात निश्चित झाल्याचे जनतेतून बोलले जात आहे.
हेही वाचा :