अमरावती : ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक ठार

अमरावती : ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक ठार
Published on: 
Updated on: 

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : वरुडकडे भरधाव जाणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक ठार झाले.  मंगळवारी माहुली जहांगीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चिंचखेड फाट्यावर घडली. माहुली जहागीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचेही मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केले. ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार,चींचखेड फाट्यानजीक ट्रॅव्हल्स ( क्र.एम.पी.३०,पी.२९५ ) आणि दुचाकीची धडक झाली. नागरिकांनी माहुली जहागीर पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्‍काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तसेच मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news