सोलापूर : माळीनगर येथील नीरा नदीवरील बंधाऱ्याचा भराव तुटला

माळीनगर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या चार दिवसांपासून घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने माळशिरस तालुक्यातील निरा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. माळीनगर पूर्व भागात अनेक ठिकाणी नदीवरील बंधाऱ्यांचा भराव तुटला आहे. धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असून पाण्याचा वेग तीव्र असल्याने नदीकाठावर धोकादायक स्थिती आहे.
पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे तुडुंब भरलेल्या धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. माळशिरस तालुक्यातही पूरस्थीती निर्माण झाली आहे. अकलाई-लुमेवाडी, तांबवे-ओझरे बंधाऱ्यावर पाणी आले. लुमेवाडी-माळीनगर व गिरवी-गणेशगाव या गावांना जोडणाऱ्या कोल्हापुर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा भराव तुटला आहे. दोन वर्षांपूर्वीच या बंधाऱ्यांची डागडूजी करण्यात आली होती. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांना जोडणारे महत्त्वाचे बंधारे वाहतुकीसाठी बंद झाल्याने दळणवळणाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. सध्या शाळांच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
हेही वाचा :
- इंग्लंडमध्ये ‘स्वाभिमानी’ स्टाईल आंदोलन; दूध फेकून व्यक्त होत आहे रोष – ‘हे’ आहे कारण! Anti Dairy Protest in UK
- Reah Chakraborty : सुधा भारद्वाजनी सांगितले रियाचे किस्से, काय घडलं जेलमध्ये?
- ब्रेकिंग : उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, मशाल चिन्हाबाबतची समता पक्षाची याचिका फेटाळली